नागपूर : नागपूर : माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या आई मुक्ता बोबडे यांचे मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास नागपूर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 96 वर्षाच्या होत्या. त्यांच्यावर अनेक दिवसांपासून वैद्यकीय उपचार सुरू होते. परंतु त्यांनी सोमवारपासून उपचारास प्रतिसाद देने बंद केले होते. दरम्यान, मध्यरात्रीनंतर त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर दुपारी ४ वाजता मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. (Former Chief Justice Sharad Bobde Mother Mukta Bobde passes away)
शरद बोबडे हे देशाचे 47 सरन्यायाधीश होते. ते २३ एप्रिलपर्यंत या पदावर कार्यरत होते. ऐतिहासिक अयोध्या प्रकरण, नागरिकत्व सुधारण कायदा, स्थलांतरीत मजूर, कृषी कायदे यांसह अनेक मुद्यांवर त्यांनी सुनावणी केली. ते २३ एप्रिल रोजी निवृत्त झाले. आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी स्वत:हून लक्ष घातलेल्या कोव्हिड-19 संदर्भात सुनावणी केली होती.