नाना पटोलेंमुळे कॉग्रेसची अवस्था वाईट, उद्धव-पवारांसमोर बोलु शकले नाही;अशोक चव्हाणांचे विधान
By योगेश पांडे | Published: April 10, 2024 05:40 PM2024-04-10T17:40:34+5:302024-04-10T17:41:36+5:30
कन्हान येथे आयोजित सभेदरम्यान ते बोलत होते.
योगेश पांडे, कन्हान (रामटेक) : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. कन्हान येथे आयोजित सभेदरम्यान ते बोलत होते.
लोकांमध्ये नेहमी राहणारा उमेदवार महायुतीने रामटेकमधून दिला आहे, नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी राज्याच्या मुख्यमंत्री होतो. गुजरातमध्ये त्यांनी खूपच चांगले काम केले. १० वर्षांत त्यांनी देशाचे स्वरूप बदलले. त्यांनी क्रांतिकारी निर्णय घेतले.
आम्ही भाजपमध्ये मोदींच्या दुरदृष्टीमुळे आलो. विरोधाला विरोध करत काही लोक अपशकून करण्याचे काम करत आहेत. कॉग्रेसमध्ये अव्यवस्थापन दिसून येत आहे. नाना पटोले कॉग्रेसच्या सर्व आशांवर पाणी फेरण्याचे काम केले. उद्धव ठाकरे व शरद पवारांसमोर ते काहीच बोलु शकत नाहीत. त्यामुळेच काँग्रेसला कमी जागा मिळाल्या. पटोले यांनी काँग्रेसची अवस्था अतिशय वाईट करून ठेवली आहे, या शब्दांत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी टीकास्त्र सोडले.