शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

पंतप्रधान मोदींंबद्दल अपमानास्पद वक्तव्य; काँग्रेस नेत्याविरुद्ध भाजपची पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 2:44 PM

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष शेख हुसेन यांनी पंतप्रधान मोदींबाबत केले आक्षेपार्ह वक्तव्य. भाजपची की गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार, कारवाईची मागणी.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे माजी शेख हुसेन यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके व प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे.

नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीनं चौकशीसाठी कार्यालयात बोलावले. यावरुन काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. काल नागपुरातील ईडी कार्यालयासमोर काँग्रेसने धरणे आंदोलन करत केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदवला. या आंदोलनादरम्यान नागपूर शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष शेख हुसेन यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. शेख हुसेन यांचा व्हिडीओ समाजमाध्यमावर  व्हायरल होत आहे. यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रवीण दटके यांनी केली आहे.

अमरावतीतही तक्रार दाखल

याप्रकरणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी व माजी शहराध्यक्ष जयंत डेहणकर यांच्या नेतृत्वात मंगळवारी बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई व तत्काळ अटक करावी अशी मागणी या तक्रारीद्वारे केली आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाnagpurनागपूर