लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ रणजी संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि बँक आॅफ इंडियाचे सेवानिवृत्त कर्मचारी सतीश टकले यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. मधुमेहाने पीडित असलेले टकले यांनी एका खासगी इस्पितळात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, स्रुषा आणि मोठा आप्तपरिवार आहे. १९८० ते १९९० च्या दशकात ३० प्रथमश्रेणी सामने खेळलेले टकले हे विदर्भातील अनेक क्रिकेटपटूंचे मेंटर आणि कोच राहिले. क्रिकेटमधील अतिशय वेगवान गोलंदाज आणि उत्तुंग फटके मारणारे फलंदाज अशी त्यांची ओळख होती. माजी क्रिकेटपटू अशोक भागवत यांचे ते आवडते शिष्य होते. शास्त्रीय संगीताचे चाहते असलेले टकले हे स्वत: उत्तम गायक तसेच व्हीसीएच्या निवड समितीवर होते. रामदासपेठ यूथ स्पोर्टिंग क्लब आणि नागपूर क्रिकेट अकादमी या क्लबच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता.
माजी क्रिकेटपटू सतीश टकले यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 10:14 AM
विदर्भ रणजी संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू आणि बँक आॅफ इंडियाचे सेवानिवृत्त कर्मचारी सतीश टकले यांचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. ते ६० वर्षांचे होते.
ठळक मुद्देवेगवान गोलंदाज व धडाकेबाज फलंदाजशास्त्रीय संगीताचे चाहते व गायक