शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

नागपूरचे माजी महापौर अटलबहादूरसिंग यांना ‘क्रीडा महर्षी’ सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 4:26 PM

अनुभवी क्रीडा संघटक, माजी महापौर अटलबहादूरसिंग यांचा नागपूर क्रीडा महर्षी म्हणून भारतरत्न सचिन तेंडुलकरच्याहस्ते सन्मान होणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी २६ मे रोजी सायंकाळी यशवंत स्टेडियम येथे होणाऱ्या सोहळ्यात पाच लाख रुपये, रोख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यात येईल, अशी माहिती आयोजन समितीचे संयोजक संदीप जोशी यांनी पत्रकारांना दिली.

ठळक मुद्देसचिन तेंडुलकरच्या हस्ते होणार गौरव : क्रीडा क्षेत्रातील २० धुरिणांचाही सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनुभवी क्रीडा संघटक, माजी महापौर अटलबहादूरसिंग यांचा नागपूर क्रीडा महर्षी म्हणून भारतरत्न सचिन तेंडुलकरच्याहस्ते सन्मान होणार आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोपप्रसंगी २६ मे रोजी सायंकाळी यशवंत स्टेडियम येथे होणाऱ्या सोहळ्यात पाच लाख रुपये, रोख, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याचा गौरव करण्यात येईल, अशी माहिती आयोजन समितीचे संयोजक संदीप जोशी यांनी पत्रकारांना दिली.पत्रकार परिषदेत बोलताना महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या विविध खेळातील २० क्रीडा धुरिणांचाही प्रत्येकी ५१ हजार रोख,शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सचिनच्याहस्ते सत्कार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. रणजी करंडक प्रथमच जिंकणाऱ्या विदर्भ क्रिकेट संघाला देखील सचिनच्याहस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.शहर आणि जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त १२० खेळाडू आणि संघटकांना देखील यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविले जाईल, असे जोशी यांनी सांगितले. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांचीही उपस्थिती राहणार आहे.ज्या २० क्रीडा धुरिणांचा सत्कार होणार आहे त्यात, भाऊ काणे अ‍ॅथ्लेटिक्स, एसजे अ‍ॅन्थोनी मॅरेथॉन, सलिम बेग फुटबॉल, डॉ, विजय दातारकर खो-खो, डॉ. दर्शन दक्षिणदास टेनिस,अरविंद गरुड बास्केटबॉल, यशवंत चिंतले गुरुजी कॅरम,बाबा देशपांडे स्केटिंग, लिखिराम मालविय जलतरण, सुनील हांडे व्हॉलिबॉल, सीडी देवरस बॅडमिंटन, त्रिलोकीनाथ सिध्रा हॉकी, अनुप देशमुख बुद्धिबळ, शरद नेवारे कबड्डी, अविनाश मोपकर टेबल टेनिस, सुहासिनी वैद्य गाडे महिला क्रिकेट, सीताराम भोतमांगे कुस्ती, दिनेश चावरे शरीरसौष्ठव आणि विजय मुनिश्वर पॅरा स्पोर्टस आदींचा समावेश आहे.निवड समितीत एसजेएएन अध्यक्ष किशोर बागडे, सचिव संदीप दाभेकर, संदीप जोशी, पीयूष अंबुलकर, डॉ. पद्माकर चारमोडे आणि मनपा क्रीडा सभापती नागेश सहारे आदींचा समावेश होता.

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडूलकरSportsक्रीडा