लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भ्रष्ट पोलिसांसोबत हातमिळवणी करून एका शेतमालकाला फसवणूक प्रकरणात कारवाईचा धाक दाखवून ४० हजारांची लाच मागणाºया माजी महापौर देवराव उमरेडकर तसेच मानकापूर पोलीस ठाण्यातील नायक विजय झोलदेव (वय ५२) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने जेरबंद केले. शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे पोलिसांत खळबळ उडाली आहे.मधुकर तिजारे (रा. मंगलधाम सोसायटी, अमरावती मार्ग) यांच्याविरोधात मानकापूर पोलीस ठाण्यात गोधनी येथील जमिनीच्या करारात फसवणूक केल्यासंबंधाचा तक्रार अर्ज होता. त्याच्या चौकशीसाठी तिजारे यांना ६ नोव्हेंबरला मानकापूर ठाण्यात बोलविण्यात आले होते. बयान घेतल्यानंतर पोलीस नायक झोलदेव याने माजी महापौर उमरेडकरच्या माध्यमातून तिजारेंना निरोप पाठवला. ४० हजार रुपये दिल्यास पोलीस कोणतीच कारवाई करणार नाही. ज्याने तक्रार दिली त्याच्यासोबत पोलीस आपसी तडजोड (सेटलमेंट) करून देतील, असेही उमरेडकरने तिजारेंना सांगितले होते. ४० हजारांची रक्कम जास्त होत असल्यामुळे दोन हप्त्यात ही रक्कम द्या, असेही उमरेडकरने सुचविले होते. काही दोष नसताना लाच कशाला द्यायची, असा विचार करून तिजारेंनी एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांची भेट घेतली. पाटील यांनी तसेच उपअधीक्षक विजय माहुलकर यांच्या माध्यमातून शहानिशा करून घेतली. माजी महापौर उमरेडकर ४० हजारांच्या लाचेसाठी तिजारेंना सारखा त्रास देतो, असे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने कारवाईसाठी सापळा रचला. त्यानुसार, लाचेचा पहिला हप्ता म्हणून २५ हजार रुपये देण्याची तयारी दाखवत शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास तिजारे उमरेडकर तसेच झोलदेव यांच्याकडे गेले. तिजारेंना या दोघांनी पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर (पुलाजवळ) थांबवले. त्यानंतर प्रारंभी उमरेडकर आणि नंतर झोलदेव तेथे आला. या दोघांनी लाचेची रक्कम स्वीकारताच बाजूलाच घुटमळत असलेल्या एसीबीचे अधिकारी, कर्मचारी यांनी उमरेडकर आणि झोलदेव यांना रंगेहात पकडले. मानकापूर ठाण्यात एसीबीची कारवाई झाल्याचे वृत्त पसरताच एकच खळबळ उडाली. या दोघांविरुद्ध मानकापूर ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.सप्ताह संपला अन्...विशेष म्हणजे, भ्रष्टाचाराविरोधात एसीबीने आठवडाभर जागर केला. दोन दिवसांपूर्वीच हा सप्ताह संपला अन् इकडे पोलीस नायकासह दोघे एसीबीच्या जाळ्यात अडकले. या कारवाईमुळे राजकारणात पुढे पुढे करून दलाली करणाºयांचेही पितळ उघडे पडले आहे. एसीबीचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विजय माहुलकर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक फाल्गुन घोडमारे, नायक रवि डाहाट, मंगेश कळंबे, रितेश तिवारी यांनी ही कामगिरी बजावली.
माजी महापौर उमरेडकरला लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 1:27 AM
भ्रष्ट पोलिसांसोबत हातमिळवणी करून एका शेतमालकाला फसवणूक प्रकरणात कारवाईचा धाक दाखवून ४० हजारांची लाच मागणाºया माजी महापौर देवराव उमरेडकर तसेच मानकापूर पोलीस
ठळक मुद्देपोलीस शिपाईदेखील अडकला : एसीबीची मानकापुरात कारवाई