शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

माजी आमदार पांडुरंग हजारे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2019 7:51 PM

 जनसामान्यांचा नेता रामटेकचे माजी आमदार पांडुरंग हजारे यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. हजारे यांच्या निधनाची माहिती कळताच जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या गांधी वॉर्ड येथील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली.

ठळक मुद्देसामान्यांचा नेता हरविला 

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर (रामटेक) :  जनसामान्यांचा नेता रामटेकचे माजी आमदार पांडुरंग हजारे यांचे शनिवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. हजारे यांच्या निधनाची माहिती कळताच जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या गांधी वॉर्ड येथील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. हजारे यांच्या पश्चात पत्नी मंदाकिनी, दोन मुले विनोद व सुनील, दोन मुली हेमलता व मंगला असा आप्त परिवार आहे.  हजारे यांनी दोनवेळा विधानसभेत तर एकवेळा विधान परिषद सदस्य म्हणून रामटेकचे प्रतिनिधित्व केले आहे. रामटेक हा काँग्रेसचा गड असताना विरोधी पक्षाचे पहिले आमदार म्हणून हजारे निवडून आले होते. १९८९ साली जनता दलाच्या तिकिटावर त्यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी पंतप्रधान नरसिंहराव यांना रामटेक लोकसभा निवडणुकीत कडवी झुंज दिली होती. त्यांचा केवळ ३४ हजार ४७० मतांनी पराभव झाला होता.१८ जानेवारी १९२८ रोजी आंबाडी, ता.कुही येथे पांडुरंग हजारे यांचा जन्म झाला होता. त्यांनी नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून इंटर्नपर्यंत शिक्षण घेतले. रामटेकच्या गांधी चौकात १९५२ ते ८६ पर्यंत हजारे यांचे हॉटेल होते. ते हॉटेलवाले हजारे म्हणूनच परिचित होते. शेतीकडे त्यांचे विशेष लक्ष होते. १९७२ साली ते राईस मिलच्या व्यवसायाकडे वळले. बापूजी अणेंच्या मार्गदर्शनात १९५७ साली हजारे यांनी राजकारणात प्रवेश केला. ते वेगळ्या विदर्भाचे खंदे समर्थक होते. त्यामुळे जांबुवंतराव धोटे यांच्या वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनात ते सक्रियतेने सहभागी होते. १९६७ साली त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन आमदार गुंडेराव महाजन यांच्याविरोधात पहिली  निवडणूक नाग विदर्भ समितीकडून लढविली, परंतु ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी जनता दलात प्रवेश केला. निवडणूक जिंकेपर्यंत लढत राहिले. जनता दलाच्या तिकिटावर ते १९८४ आणि १९८९ साली विधानसभा निवडणूक जिंकले. एकवेळा त्यांना विधान परिषदेमध्येदेखील भाजपाकडून पाठविण्यात आले. खासदारकीसाठी रामटेक लोकसभा मतदार संघातूनही ते लढले. त्यामध्ये त्यांची माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव, तेजसिंहराव भोसले, चित्रलेखा भोसले आणि सुबोध मोहिते यांच्याशी लढत झाली. १९९० साली त्यांनी जनता दलाला रामराम करीत बनवारीलाल पुरोहित यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. १९९१ साली भाजपच्या तिकिटावर तेजसिंहराव भोसले यांच्याविरोधात निवडणूक लढले. यातही त्यांचा पराभव झाला. 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर