आशीष दुबेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा वाढता प्रकोप बघता पोलीस व शासनव्यवस्था दिवसरात्र परीश्रम घेत आहे. रस्त्यांवर नाकाबंदीसह सामान्यांना मदतीसाठीही पोलीस यंत्रणा सरसावली आहे. पोलीसांवरील वाढता ताण बघता राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी)चे २५० माजी कॅडेट्स पुढे आले आहेत. या कॅडेट्सने काही दिवसांपूर्वी अतिरिक्त पोलीस आयुक्त निलेश भरणे यांना पत्र पाठविले. संकटाच्या या काळात पोलीसांना सहकार्य करण्याची परवानगी या पत्राद्वारे मागीतली गेली आहे.या पत्रात शहरातील पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीसांसोबत काम करू इच्छिणाऱ्या कॅडेट्सची यादीही देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने भरणे यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षकांना पत्र लिहून ‘एनसीसी गोल्डन गुप्र’च्या सर्व कॅडेट्सची मदत घेण्याची सूचना दिली आहे. परवानगी मिळताच सोमवारपासून गोल्डन ग्रुपचे सर्व कॅडेट्स निर्धारित पोलीस ठाण्यात जाऊन जबाबदारी सांभाळायला लागले असून, पोलीसांना सहकार्य करण्यास सुरुवातही केली आहे. पोलीस प्रशासनाकडून त्यांना ओळखपत्रही प्रदान करण्यात आले आहे.एनसीसी प्रशिक्षणातच मिळाले धडे: ग्रुप कोआॅर्डिनेटर बासित हैदरी व फौजिया हैदरी व्यवसायाने वकील आहेत. १९८५ ते आतापर्यंतचे एनसीसी कॅडेट्स या ग्रुपशी जुळलेले आहेत. एनसीसीमध्ये एकता आणि अनुशासनाचे धडे गिरविल्यानंतर देशावर जेव्हाही संकटाची स्थिती निर्माण होईल, तेव्हा त्या संकटाचा सामना करण्याची वृत्ती या कॅडेट्समध्ये अल्याचे बासित व फौजिया यांनी सांगितले. हीच भावना बघून हा ग्रुप तयार केला आहे. या कामासाठी सर्व कॅॅडेट्स स्वेच्छेने पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.जनजागृती अभियान राबविणार: पोलीसांसोबत मिळून सर्व कॅडेट्स नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करतील. नागरिकांना सामाजिक अंतर ठेवण्यास मदत करतील. सोबतच गरीब व गरजूंना मदत सामुग्रीचे वितरण करतील. तसेच विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना समजावून घरी पाठविण्याचे कार्य करतील. बाजारातही सोशल डिस्टन्सिंगची माहिती देतील. गर्दी कमी करण्यासाठी हे कॅडेट्स पोलीसांना सहकार्य करतील.व्यवसायिकांसोबतच शासकीय कर्मचाऱ्यांचाही सहभाग: एनसीसी गोल्डन ग्रुपमध्ये सर्वच माजी कॅडेट्स सहभागी आहेत. यात कोणी व्यावसायिक आहे तर कोणी शिक्षक, वकील आणि कोणी सरकारी कर्मचारी आहे. अनेकांचे स्वत:चे लहान मोठे उद्योग धंदेही आहेत. संकटाच्या या काळात त्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे.