नागपूर : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीला काँग्रेसच्या वतीने विविध ठिकाणी आदरांजली अर्पण करण्यात आली. कोरोना संक्रमणाच्या अनुषंगाने काही ठिकाणी भोजनदान तर काही ठिकाणी सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.
कांजीहाऊसमध्ये भोजनदान
राजीव गांधी यांना उत्तर नागपूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांकडून कांजी हाऊसमध्ये आदरांजली वाहण्यात आली. यावेळी भोजनदान करण्यात आले. याप्रसंगी रत्नाकर जयपुरकर, हरिभाऊ किरपाने, रामाजी उइके, मूलचंद मेहर, अजीज खान, सिंधुताई बोरकर, प्रशांत पंडारे उपस्थित होते.
ब्लॉक क्रमांक १३
क्लाॅक क्रमांक १३च्या वतीने भोजनदान करण्यात आले. काँग्रेसचे प्रवक्ता संजय दुबे, फिलिप्स जायस्वाल, सुरेश पाटिल, दौलत कुंगवानी, विजयालक्ष्मी हजारे, सतीश पाली, डायना बिंगेकर, गौतम अंबादे, सप्तऋषि लांजेवार, राकेश इखार, दीपक अहिरवार, गीताबाई इंगोले उपस्थित होते.
रोपटे, मास्क, सॅनिटायझरचे वितरण
युवक काँग्रेसच्या वतीने रोपट्यांचे वितरण करण्यात आले. स्वच्छता कर्मचारी व नागरिकांना हॅण्डग्लव्हज, मास्क, सॅनिटायझर वाटण्यात आले. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव अजित सिंह, आसिफ शेख, नगरसेवक दिनेश यादव, सतीश पाली, साहबराव सिरसाट, सलीम मस्ताना, नीलेश खोब्रागड़े, राकेश इखार, राम यादव, संतोष खड़से उपस्थित होते.
पाच हजार व्हेपोरायझर मशिन वाटल्या
नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्त्वात शहरातील वेगवेगळ्या भागात गरजूंना स्टिम घेण्यासाठी व्हेपोरायझर मशीन वाटण्यात आली. यावेळी वसीम वहाब शेख, इरफान काजी, आकाश गुजर, कुणाल खड़गी, नयन तरवटकर,हेमंत कातुरे,सहदेव गोसावी,मोइज शेख,अभिषेक जैन, स्वप्निल ढोके, अक्षय घाटोले, सागर चव्हाण, राजू अंसारी, अखिलेश राजन, शुभम तल्हार, मुब्बशिर अहमद, राजेश गुजर, हितेश गोतमारे, माधव जुगेल उपस्थित होते.
शासकीय कार्यालयात दशहतवाद विरोधी दिन
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची पुण्यतिथी दशहतवाद व हिंसा विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्ताने शासकीय कार्यालयात राजीव गांधी यांना आदरांजली वाहताना दशहतवाद विराधाची प्रतिज्ञा करण्यात आली.
विभागीय आयुक्त कार्यालय : अपर आयुक्त संजय धिवरे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शांती, सामाजिक एकता व विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करण्याची शपथ दिली. उपायुक्त श्रीकांत फडके, चंद्रभान पराते, तहसीलदार अरविंद सेलोकर, नायब तहसीलदार संदीप वड़से, आर.के. दिघोले यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्यालय : येथे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शपथ दिली. अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातड़े, सुजाता गंधे, शीतल देशमुख उपस्थित होते.
अखिल भारतीय असंघटित कामगार काँग्रेस
राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनाला अ. भा. असंघटित कामगार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या निर्देशानुसारा शहिद दिवसाल मजूरांना धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय समन्वयक राजेश निंबाळकर, रत्नमाला, किशोर माथने, पुनम, पंकज कुमार उपस्थित होते.
नागपूर महानगर पालिका
नागपूर महानगर पालिकेच्या वतीने राजीव गांधी यांना अभिवादन करण्यात आले. राजीव गांधी यांचा स्मृतीदिन “दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस” म्हणून पाळण्यात आला. म.न.पा केन्द्रीय कार्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात राजीव गांधी यांच्या प्रतिमेला महापौर दयाशंकर तिवारी, उपमहापौर मनीषा धावडे, आयुक्त राधाकृष्णन बी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाणे, उपायुक्त निर्भय जैन व राजेश भगत व रविंद्र भेलावे, सहा.आयुक्त महेश धामेचा उपस्थित होते.
................