नागपूर : ऑनलाईन जुगार चालविणाऱ्या चार आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट ४ ने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
काशीनाथ दादाजी येवले (वय ४३, रा. स्वामी नारायण मंदिराच्या मागे), सैय्यद समीर सैय्यद जान मोहम्मद (वय २२, रा. शिवनकरनगर, खरबी), शेख जुनैद शेख मजिद (वय २०, रा. सतरंजीपुरा), समीर शफी शेख (वय २६, रा. शक्तीमातानगर, नंदनवन) आणि अब्दुल रऊफ अब्दुल हक (वय ५०, रा. शिवनकरनगर नंदनवन) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत हसनबाग चौक, कब्रस्तान गेटजवळ, आलम दुल्लील्हा दुकानात गुरुवारी २२ जूनला दुपारी २ वाजता धाड टाकली. तेथे चारही आरोपी बंद खोलीत विना परवाना ऑनलाईन लक्की कुपनवर पैसे लाऊन हार-जीतचा जुगार खेळताना आढळले. त्यांच्या ताब्यातून जुगाराचे साहित्य किंमत १ लाख ५६ हजार जप्त करून त्यांच्याविरुद्ध जुगार कायदा कलम ४, ५ नुसार नंदनवन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई निरीक्षक गोकुल सुर्यवंशी, सहायक पोलिस निरीक्षक अरविंद शिंदे, उपनिरीक्षक अविनाश जायभाये, निरंजना उमाळे, नाजीर शेख, पुरुषोत्तम काळमेघ, बजरंग जुनघरे, दिपक चोले, आशिष क्षीरसागर, संदिप मावलकर, विलास चिंचुलकर, सतेंद्र यादव, श्रीकांत मारवाडे यांनी केली.