नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने रविवारी रेल्वे परिसरात अवैधरीत्या दारूची विक्री करीत असलेल्या चार आरोपींना रंगेहात अटक करून, २,३२० रुपयांची देशी दारू जप्त केली आहे. ही कारवाई सायंकाळी ५ वाजता आरपीएफचे सहायक उपनिरीक्षक आर.एन. यादव, कॉन्स्टेबल बी.एन. मदनकर, जसवीर सिंह यांनी मंगळवारी ब्रिजजवळ रेल्वे परिसरात केली. येथे चार आरोपींना १२ लीटर मोहाची दारू आणि ९० मिलीलीटरच्या देशी दारूच्या २८ बॉटल्ससह अटक करण्यात आली. आरोपीत दारू विक्रेता मुदिका सुमन सोंदिया, निमोनीनगर जरीपटका यास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आले, तर इतर तीन आरोपींना आरपीएफने रेल्वे अॅक्टनुसार अटक केली आहे. यापूर्वीही या परिसरात आरपीएफने धाड टाकून तीन आरोपींना दारूसह अटक केली होती.
.............