शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
2
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
6
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
7
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
8
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
9
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
10
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
11
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
12
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
13
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
14
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
15
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
16
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
17
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
18
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर

चार दिवस अनुयायींसाठी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2017 1:34 AM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे १५०० सैनिक दीक्षाभूमीवर शुक्रवारपासून सज्ज झाले आहेत. दिल्ली ते राजस्थान येथून हे सैनिक आले आहेत.

ठळक मुद्देसमता सैनिक दलाची सेवा सुरक्षा : देशाच्या कानाकोपºयातील सैनिकांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या समता सैनिक दलाचे १५०० सैनिक दीक्षाभूमीवर शुक्रवारपासून सज्ज झाले आहेत. दिल्ली ते राजस्थान येथून हे सैनिक आले आहेत. दीक्षाभूमीवरील प्रत्येक आंबेडकरी अनुयायी सुरक्षित राहावा, त्याची गैरसोय होऊ नये म्हणून डोळ्यात तेल घालून सलग चार दिवस हे सैनिक नि:स्वार्थपणे सुरक्षा व सेवा देण्यासाठी तैनात झाले आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ मार्च १९२७ रोजी महाडला एक परिषद भरविली होती. या परिषदेत त्यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली. समता सैनिक दलाच्या उपस्थितीमुळे आंबेडकरी चळवळीतील अनेक कार्यक्रम सुखरूपपणे पार पडले. चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकचा सत्याग्रह, १९५६ सालचा बाबासाहेबांचा नागपुरातील धर्मांतरण सोहळा असो किंवा नामांतराचा लढा , १९८७ मधील दंगल असो की घाटकोपर दंगल प्रत्येकवेळी समता सैनिक दलाने महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली. निळी टोपी, पांढरा शर्ट, खॉकी पॅण्ट आणि हातात काठी हा गणेवशधारी सैनिक दरवर्षी दीक्षाभूमीवरही आपली सेवा देत आहे.६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने शुक्रवारपासून या सैनिकांनी आपली जागा घेऊन सुरक्षेसाठी सज्ज झाले आहेत.देशाच्या कानाकोपºयातून येतात सैनिकसमता सैनिक दलाचे राष्टÑीय जीओसी प्रदीप डोंगरे म्हणाले, भदन्त नागदीपंकर थेरो यांच्या मार्गदर्शनात समता सैनिक दलाचे राष्टÑीय अध्यक्ष डी. कोेचे, एम. आर. राऊत यांच्या नेतृत्वात दीक्षाभूमीवर होणाºया ६१ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात आपली सेवा व सुरक्षा व्यवस्था बजावण्यासाठी देशातून दीड हजार सैनिक आले आहेत. यात महाराष्टÑसह दिल्ली, छत्तीसगड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, तामिळनाडू येथून हे सैनिक आले आहेत.सुरक्षेसोबतच सेवाहीडोंगरे यांनी सांगितले, दीक्षाभूमीवर सलग चार दिवस समता सैनिक दलाचे सैनिक सुरक्षेबरोबरच असामाजिक तत्त्वांवर नियंत्रण, शिस्तीत लोकांना स्तूपापर्यंत घेऊन जाण्याचे काम, लोकांना सहकार्य, गर्दी निवळण्याचे काम, आजारींना हेल्थ कॅम्पपर्यंत घेऊन जाण्याचे काम, हरविलेल्यांना सहयोग स्थळी घेऊन जाण्याचे कामही हे सैनिक करतात. प्रमिला संघर्षसूत सिद्धार्थ, प्रा. संजय घोडके, प्रा. गजेंद्र गजभिये, संघप्रिय नाग, सी.टी.मेश्राम, अमरदीपंकर, पृथ्वी एन. मोटघर यांचे विशेष सहकार्य असते.