शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी घडामोड! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी निर्णय बदलला, सिंदखेड राजामध्ये शिंदेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला
2
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
4
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
5
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
6
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकातच सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’,  भाजपा खासदार अनिल बोंडे यांचा टोला
7
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
8
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
9
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
10
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
11
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
12
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
13
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
14
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
15
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
16
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
17
Mamaearth Shares: कंपनीचा शेअर आपटला; २० टक्क्यांची घसरण, IPO प्राईजच्याही खाली आला भाव
18
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
19
IND vs AUS टेस्टआधी आणखी एक ट्विस्ट; स्पेशल कॉलनंतर पुजारा 'फ्लाइट मोड'वर
20
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."

नागपूर  जिल्ह्यात  दोन अपघातांमध्ये चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 10:06 PM

Accidents Four diesनागपूर जिल्ह्यात २४ तासात झालेल्या अपघाताच्या दाेन वेगवेगळ्या घटनांमध्ये चाैघांचा मृत्यू झाला असून, दाेघे जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देमृतांमध्ये वडील व मुलासह विद्यार्थ्याचा समावेश : धामणा व पारशिवनी येथील घटना

लाेकमत न्यूज नेटवर्कधामणा/पारशिवनी : नागपूर जिल्ह्यात २४ तासात झालेल्या अपघाताच्या दाेन वेगवेगळ्या घटनांमध्ये चाैघांचा मृत्यू झाला असून, दाेघे जखमी झाले आहेत. मृतांमध्ये वडील व मुलासह विद्यार्थ्याचा समावेश आहे. जखमींमध्येही महिला (आई) व एक विद्यार्थी आहे. अपघाताची पहिली घटना पारशिवनी शहरात बुधवारी (दि. ६) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. यात भरधाव ट्रॅव्हल्सने माेटरसायकलला मागून धडक दिली. दुसरी घटना नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा शिवारात गुरुवारी (दि. ७) सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली असून, यात सुसाट कार ट्रकच्या मागच्या भागावर आदळली. डाॅ. बाबुराव श्रावण भुरे (६२), गणेश बाबुराव भुरे (२५) दाेघेही रा. पंचवटी आश्रम, दिघाेरी, नागपूर, यश भालेराव (१७) व अनुप अतुल पनवेलकर (१४) दाेघेही रा. पारशिवनी अशी मृतांची तर वंदना बाबुराव भुरे (५०, रा. पंचवटी आश्रम, दिघाेरी, नागपूर) व लकी चव्हाण (१४, रा. पारशिवनी) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. भुरे कुटुंबीय एमएच-३१/डीके-४४२६ क्रमांकाच्या कारने काेंढाळी (ता. काटाेल)हून नागपूरला जात हाेते. ते धामणा शिवारात पाेहाेचताच त्यांची कार राेडवर उभ्या असलेल्या डीडी-०३/एम-९१८४ क्रमांकाच्या ट्रकवर मागून धडकली. यात वडील डाॅ. बाबूराव व मुलगा गणेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर आई वंदना गंभीर जखमी झाल्या. दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून, वंदना यांना उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.तत्पूर्वी, पारशिवनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात भरधाव ट्रॅव्हल्सने माेटरसायकलला मागून धडक दिल्याने दाेघांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. यश भालेराव, अनुप पनवेलकर व लकी चव्हाण तिघेही एमएच-४०/बीबी-४१३७ क्रमांकाच्या माेटारसायकलने खापरखेडा (ता. सावनेर) येथून पारशिवनीला येत हाेते. ते शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चाैकात पाेहाेचताच मागून वेगात येणाऱ्या एमएपी-४८/पी-०२९१ क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सने त्यांच्या माेटारसायकलला जाेरात धडक दिली. त्यात यश व अनुपचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर लकी गंभीर जखमी झाला. अपघात हाेताच नागरिकांसह पाेलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दाेघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तर लकीला उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात नेले. तिथे लकीवर प्रथमाेपचार करून त्याला उपचारासाठी नागपूर येथील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याप्रकरणी अनुक्रमे हिंगणा व पारशिवनी पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

क्रेनची मदतधडक एवढी जबर हाेती ती कार थेट ट्रकच्या आत शिरली हाेती. धडक लागताच कारची चारही दारे ‘लाॅक’ झाली हाेती. त्यामुळे आतील जखमींना वेळीच बाहेर पडणे शक्य झाले नाही. यात समाेर बसलेले कारचालक गणेश भुरे व त्यांचे वडील डाॅ. बाबूराव भुरे यांचा मृत्यू झाला. ट्रकमध्ये अडकलेली कार बाहेर काढण्यासाठी पाेलिसांना ‘क्रेन’ची मदत घ्यावी लागली. या अपघातामृळे महामार्गाच्या एका ‘लेन’वरील वाहतूक ठप्प झाली हाेती. कार बाजूला केल्यानंतर हिंगणा पाेलिसांनी वाहतूक सुरळीत केली. नागरिकांचा राेष लक्षात घेता पारशिवनी पाेलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेली ट्रॅव्हल्स खापा (ता. सावनेर) पाेलीस ठाण्याच्या आवारात जमा केली हाेती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू