.................
व्यापाऱ्याची १३.८३ लाखांनी फसवणूक
नागपूर : इमामवाडा येथील ए. के. गांधीच्या कर्मचाऱ्यांनी १३.८३ लाखांनी फसवणूक केली आहे. इमामवाडा पोलिसांनी आरोपी हर्षल खवास, रा. स्वागतनगर, विनोद राऊत रा. इतवारी स्टेशन, स्वप्निल वानखेडे रा. कळमना मार्केट आणि कौस्तुभ काळ रा. संघ बिल्डिंगजवळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रामदासपेठ येथील रहिवासी उद्योजक यश अशोककुमार गांधी यांचे उंटखानात ए. के. गांधी टीव्हीएस शो रूम आहे. गांधी यांचा मोबाईल विक्रीचाही व्यवसाय आहे. आरोपी त्यांच्या दुकानात काम करीत होते. आरोपींनी शोरूममधून वेगवेगळ्या व्यापाऱ्यांच्या नावाने १३.८३ लाखांचे मोबाईल घेतले. हे मोबाईल संबंधित व्यापाऱ्यांऐवजी दुसऱ्यांना विकून १३.८३ लाख रुपये हडपले. इमामवाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
............
डिलिव्हरी बॉयची फसवणूक
नागपूर : ॲमेझॉनच्या डिलिव्हरी बॉयची ८७ हजारँनी फसवणूक केल्याची घटना घडली आहे. कथित कुणालने ॲमेझॉनचे प्रोडक्ट ऑनलाईन बुक केले. ॲमेझॉनचा डिलिव्हरी बॉय सामान घेऊन पोहोचला असता त्याने त्याच्याशी मैत्री केली. पार्सलमध्ये ठेवलेले महागडे प्रोडक्ट काढून दुसरे सामान ठेवले आणि ८७ हजारांनी फसवणूक केली. प्रतापनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी अशाच फसवणुकीच्या प्रकरणात अंबाझरी पोलिसांनी एका बेरोजगार युवकाला अटक केली होती.
............