लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील विविध भागांमध्ये दुचाकी आणि मोबाईल चोरणारी टोळी सीताबर्डी पोलिसांच्या हाती लागली आहे. या टोळीत चार अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. हे चारही आरोपी माजरी येथील रहिवासी आहेत. या आरोपींजवळून १० दुचाकी वाहने आणि ७ मोबाईलसह ५ लाख ६१ हजार रुपयाच्या वस्तू जप्त करण्यात आल्या. या आरोपींविरुद्ध शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. यात सीताबर्डी ठाण्यात ९, नंदनवनमध्ये १, कळमन्यात २, मानकापूर १ आणि गणेशपेठमध्ये १ सह १४ गुन्हे उघडकीस आले आहेत.डीसीपी चिन्मय पंडित यांनी सांगितले की, काही दिवसांपासून सीताबर्डी परिसरात मोबाईल हिसकावणे आणि वाहन चोरीच्या घटना वाढल्या होत्या. यामुळे ठाणेदार जगवेंद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात एपीआय पी.एम. काळे, हवालदार जयपाल, चंद्रशेखर, प्रशांत, पंकज, दिनेश यांची एक चमू गठित करून त्यांच्यावर या प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली. आरोपीचा शोध घेत असतांना घटनास्थळाजवळचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तेव्हा एक पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवर संशयास्पद युवक दिसून आला. त्या युवकावर सातत्याने नजर ठेवण्यात आली. याचप्रकारे संदिग्ध अल्पवयीन मुलगा चोरीच्या गाडीवर फिरतांना दिसून आला. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपल्या तीन साथीदारांसोबत वाहन आणि मोबाईल चोरल्याची कबुली दिली. यानंतर सर्वांना ताब्यात त्यांच्याकडून लाखो रुपयांची वाहने व मोबाईल जप्त करण्यात आले.
चार अल्पवयीन वाहन चोर पोलिसांच्या जाळ्यात : १० गाड्या, ७ मोबाईलसह ५ लाख ६१ हजाराचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 10:31 PM
शहरातील विविध भागांमध्ये दुचाकी आणि मोबाईल चोरणारी टोळी सीताबर्डी पोलिसांच्या हाती लागली आहे. या टोळीत चार अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे. हे चारही आरोपी माजरी येथील रहिवासी आहेत. या आरोपींजवळून १० दुचाकी वाहने आणि ७ मोबाईलसह ५ लाख ६१ हजार रुपयाच्या वस्तू जप्त करण्यात आल्या.
ठळक मुद्देनागपूरच्या सीताबर्डी पोलिसांची कामगिरी : १४ प्रकरणे उघडकीस