लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चार महिन्यांपूर्वी सहा वर्षीय मुलीने गिळलेली पीन बाहेर काढण्यासाठी गरीब आई-वडिलांनी चार-पाच डॉक्टरांना दाखविले. पैसा गेला, परंतु पीन पोटातच होती. असह्य वेदनेने मुलगी तडफडत होती. अखेर तिला मंगळवारी नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी विभागात दाखल केले. चार महिने पोटात पीन असल्याने आतड्यामध्ये रुतून बसली होती. विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी जोखीम पत्करली. पोटातून पीन बाहेर काढण्यात त्यांना यश आले. विनाशस्त्रक्रिया व सुस्थितीत पीन काढल्याने आई-वडिलांच्या चेहऱ्यावर डॉक्टरांप्रति समाधान होते.पायल संजय धारण (६) रा. खुटवंडा तहसील भद्रावती जिल्हा चंद्रपूर असे त्या रुग्णाचे नाव. पायलचे वडील संजय हे मजुरीचे काम करतात तर, आई कुंदा गृहिणी आहे. चार महिन्यांपूर्वी पायल घरी खेळत होती. केसाना लावायची चार सेंटीमीटरची पीन तिने तोंडात ठेवली होती. खेळताना अचानक पीन पोटात गेली. आई-वडिलांनी तातडीने वरोरा येथील खासगी इस्पितळात नेले. डॉक्टरांन एक्स-रे काढल्यावर पोटात पीन असल्याचे सांगितले. औषधे दिले. परंतु पीन निघाली नाही. पायलला दुसºया डॉक्टरांकडे घेऊन गेले. त्यांनीही औषधी दिली परंतु, पोटात पीन असल्याने दुखणे कायम होते. चार-पाच डॉक्टरांना दाखवून झाल्यावर तिला चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासल्यावर नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितले. मंगळवारी ‘सुपर’च्या गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी विभागाची ‘ओपीडी’ संपली होती. तरीही डॉ. गुप्ता यांनी तिला तपासले. एक्स-रे केल्यानंतर पोटातील छोट्या आतड्यामध्ये पीन फसून असल्याचे स्पष्ट झाले. गुरुवारी ‘एन्डोस्कोपी’च्या मदतीने ती बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु चार महिने पोटात पीन असल्याने ती कशा अवस्थेत असेल व बाहेर काढताना कुठलाही धोका होण्याची चिंता होती. तरीही अनुभव कौशल्याचा बळावर डॉ. गुप्ता यांनी अवघ्या दहा मिनिटांत पीन बाहेर काढली. विना शस्त्रक्रिया पोटातून पीन काढल्याने आई-वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले.डॉ. गुप्ता यांच्या मदतीला डॉ. नितीन गायकवाड, डॉ. तुषार संकलेचा, डॉ. हरीत कोठारी, डॉ. इमरान, डॉ. विनीत गुप्ता, डॉ. साहिल परमार, एन्डोस्कोपी तंत्रज्ञ सोनल गट्टेवार यांच्यासह सायमन माडेवार, रेखा लेने, शितल हुलके व रिना महल्ले आदींनी सहकार्य केले.पायलच्या पोटात चार महिन्यांपासून पीन होती. यामुळे पीनचा काही भाग गळून शौचावाटे बाहेर पडला. परंतु पीनचा तीक्ष्ण भाग छोट्या आतड्यामध्ये फसून होता. पीन बाहेर काढताना आणखी आत रुतून आतडीला छिद्र करण्याचा व इतरही धोके होते. परंतु अनुभव, कौशल्याच्या बळावर व सहकाऱ्यांच्या मदतीने पीन बाहेर काढणे शक्य झाले.डॉ. सुधीर गुप्ताप्रमुख, गॅस्ट्रोएन्ट्रालॉजी विभाग, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल
चार महिन्यांपूर्वी गिळलेली पीन काढली बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 9:29 PM
चार महिन्यांपूर्वी सहा वर्षीय मुलीने गिळलेली पीन बाहेर काढण्यासाठी गरीब आई-वडिलांनी चार-पाच डॉक्टरांना दाखविले. पैसा गेला, परंतु पीन पोटातच होती. असह्य वेदनेने मुलगी तडफडत होती. अखेर तिला मंगळवारी नागपूरच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी विभागात दाखल केले. चार महिने पोटात पीन असल्याने आतड्यामध्ये रुतून बसली होती. विभाग प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी जोखीम पत्करली. पोटातून पीन बाहेर काढण्यात त्यांना यश आले. विनाशस्त्रक्रिया व सुस्थितीत पीन काढल्याने आई-वडिलांच्या चेहऱ्यावर डॉक्टरांप्रति समाधान होते.
ठळक मुद्दे‘सुपर’मध्ये झाली यशस्वी शस्त्रक्रिया : गरीब आई-वडिलांनी मानले डॉक्टरांचे आभार