लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: उपराजधानीतील आमदार निवास येथे क्वारंटाईन असलेल्या चार संशयितांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या वाढीव संख्येमुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या ६३ वर गेली आहे.१९७ मधून १९२ नमुने निगेटिव्हअखिल •ाारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) ८३ नमुने तपासले. यात यवतमाळ जिल्ह्यातील ५८ तर अमरावती जिल्ह्यातील २५ नमुन्यांचा समावेश होता. अमरावतीमधील चार नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उर्वरित ७९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. मेयो प्रयोगशाळेने ६५ नमुने तपासले, यात ५२ नमुने आमदार निवास, उर्वरित १३ नमुन्यांमधून काही मेयो व •ांडारा जिल्ह्यातील होते. यातील एक नमुना पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित ६४ नमुने निगेटिव्ह आले. मेडिकलने ४९ नमुने तपासले. या नमुन्यांचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. एकूण १९७ नमुन्यांमधून १९२ नमुने निगेटिव्ह आले आहेत.अलगीकरण कक्षात ४० संशयितांची •ारवनामती, आमदार निवास, रवि•ावन, लोणारा व सिम्बायोसिस या पाच संस्थांत्मक अलगीकरणात आणखी ४० संशयितांची •ार पडली. तर ५३ संशयितांचे दुसरे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले.
Corona Virus in Nagpur; नागपुरात अजून चार संशयितांचा अहवाल आला पॉझिटिव्ह; एकूण ६३
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 9:57 AM