लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नियंत्रण कक्षात एकाच दिवशी सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची अफवा पसरल्यामुळे खळबळ उडाली. परंतु तीन दिवसात सहा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती डीआरएम शोभना बंदोपाध्याय यांनी दिली. तसेच शुक्रवार, शनिवार आणि रविवारी तीन दिवस कार्यालय बंद राहणार असून नियंत्रण कक्षाचे ही निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागीय कार्यालयासमोर नियंत्रण कक्ष आहे . या कक्षात मागील तीन दिवसात सहा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले आहेत. गुरुवारी चार रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्यामुळे रेल्वेत खळबळ उडाली. काही जणांनी एका दिवशी सहा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याची अफवा उडविली. परंतु पॉझिटिव्ह कर्मचाऱ्यांची संख्या चार असून नियंत्रण कक्षाचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आले असल्याची माहिती बंदोपाध्याय यांनी दिली. डीआरएम कार्यालयातील अनेक कार्यालय यापूर्वीच बंद करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांची संपूर्णपणे काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन त्यांनी केलेकोरोनाचे रुग्ण आढळल्यामुळे शुक्रवारी डीआरएम कार्यालय बंद राहणार आहे. शनिवार आणि रविवारी कार्यालयाला सुटी असते. त्यामुळे तीन दिवस सतत कार्यालय बंद राहणार आहे. नियंत्रण कक्ष बंद ठेवणे शक्य नाही. या पक्षाचे पूर्णपणे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.-शोभना बंदोपाध्याय, डीआरएम, दपूम रेल्वे नागपूर विभाग.
रेल्वेत निघाले चार पॉझिटिव्ह : डीआरएम, कार्यालय राहणार तीन दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 7:59 PM
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील नियंत्रण कक्षात एकाच दिवशी सहा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची अफवा पसरल्यामुळे खळबळ उडाली. परंतु तीन दिवसात सहा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती डीआरएम शोभना बंदोपाध्याय यांनी दिली.
ठळक मुद्देसहा पॉझिटिव्हची अफवा