शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
2
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
3
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
4
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
5
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
6
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
7
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
8
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?
9
IND vs NZ : शिकाऱ्यांची शिकार झाली! आपल्याच घरात भारताचा दारुण पराभव; टीम इंडिया कुठे चुकली?
10
टीम इंडियाला घरच्या मैदानात धोबीपछाड; न्यूझीलंडनं पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत रचला इतिहास
11
न्यूझीलंड विरुद्ध सलग दोन पराभव; WTC फायनल गाठण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं चॅलेंज
12
अखेर Andheri East Assembly चा महायुतीचा उमेदवार ठरला; भाजपचा नेता शिंदेंच्या सेनेतून लढणार
13
'दरवेळी ऑफर देतात'; बाळासाहेब थोरात-संजय राऊतांबद्दल देशमुखांचा गौप्यस्फोट
14
कडक सॅल्यूट! हातावरच्या रेषा नशीब ठरवत नाहीत...; डिलिव्हरी बॉयचा डोळे पाणावणारा Video
15
ऐन निवडणुकीत महाराष्ट्रात नवीन राजकीय पक्षाचा उदय; २८८ जागा लढवणार, काय आहे नाव?
16
'या' भाषा भारतात सर्वाधिक बोलल्या जातात; तुम्हाला माहितीये का?
17
मी ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी पात्र आहे का? मनूची पोस्ट; चाहत्यांनी उडवली खिल्ली मग...
18
जयश्री थोरातांवरील आक्षेपार्ह वक्तव्यावर बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सुजय विखेंचे ढोंग...
19
छत्रपती संभाजीराजेंचा मनोज जरांगेंकडे युतीचा प्रस्ताव; अपक्ष उमेदवारीचे सांगितले तोटे
20
"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"

महाराष्ट्रात दोन महिन्यांत रेल्वेच्या चार दुर्घटना टळल्या

By नरेश डोंगरे | Published: July 06, 2023 3:18 PM

कर्मचाऱ्यांचा बुधवारी सत्कार करण्यात आला

नरेश डोंगरे 

नागपूर : रेल्वे कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखविल्यामुळे महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यात रेल्वेच्या चार संभाव्य दुर्घटना टळल्या. सतर्कता दाखवून या दुर्घटना टाळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मध्य रेल्वेच्या वतिने बुधवारी सत्कार करण्यात आला. नागपूर, मुंबई, भुसावळ आणि सोलापूर विभागातील हे चार कर्मचारी आहेत.

सत्कार झालेल्यांमध्ये नागपूर विभागातील की-मेन गणेश युवाने यांचा समावेश आहे. ते धामणगावला राहतात. १३ मे रोजी ते धामनगाव - डेपोरी रेल्वेमार्गावर कर्तव्यावर होते. ट्रेन नंबर २२८४६ हटिया पुणे एक्सप्रेस या रेल्वेमार्गावरून धावत असताना त्यांना एका कोचखालून घर्षणामुळे स्पार्किंग होत असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच या ट्रेनला थांबविण्यासाठी रेड सिग्नल दिला. मात्र, ट्रेन पुढे निघून गेली. त्यामुळे गणेश यांनी सर्व वरिष्ठांना संभाव्य दुर्घटनेची माहिती देऊन ट्रेन थांबविण्याची विनंती केली. शेवटी ओएचई सप्लाय बंद करून ट्रेनला थांबविण्यात आली. गणेश यांच्या या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली.

अशाच प्रकारे रेल्वेच्या मुंबई विभागातील सुनील पाटील (पॉईंटसमन, नेरूळ) यांनी ७ जूनला सकाळी जुई नगरातील एस अॅन्ड टी जंक्शन बॉक्समध्ये लागलेली आग तातडीने विझविण्यात महत्वाची भूमीका वठविली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

भूसावळ विभागातील रमेश सखाराम (ट्रॅक मेंटेनर, बडनेरा) हे २२ मे रोजी कर्तव्यावर असताना त्यांना बडनेरा यार्डच्या पॉईंट १२१ वर रेल्वे फ्रॅक्चर दिसला. रमेश यांनी त्या मार्गाने येणाऱ्या मालगाडीला रेड सिग्नल देऊन जागेवरच थांबविले. परिणामी मोठा अपघात टळला. तर, सोलापूर विभागातील वैभव शर्मा (सहायक लोको पायलट, कुर्दूवाडी) हे ११ जूनला कर्तव्यावर असताना बीम नंबर १ ची स्कॅनिंग करत होते. त्यांना मालगाडीच्या ट्रॅकची हेलिकल रिंग तुटलेली दिसली. हा प्रकार त्यांनी संबंधित वरिष्ठांच्या लक्षात आणून दिल्यानंतर लगेच दुरूस्ती करण्यात आली. त्यामुळे रेल्वे अपघात टळला.

उपरोक्त चारही कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना सतर्कता आणि प्रसंगावधान दाखविल्यामुळे चार रेल्वे अपघात टळल्याने या चारही कर्मचाऱ्यांचा बुधवारी सत्कार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या हॉलमध्ये मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांच्या हस्ते रोख आणि प्रशस्तीपत्र देऊन या चाैघांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे कार्य प्रशंसनीय आणि अनुकरणीय असल्याचे यावेळी लालवानी यांनी आपल्या भाषणात म्हटले. मध्य रेल्वेच्या विविध विभागाचे अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे