देशातील एकमेव बालक : इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्मध्ये नोंदनागपूर : ज्या वयात मुलांकडून खेळण्याबागडण्याव्यतिरिक्त काहीच अपेक्षा केली जाऊ शकत नाही, त्या वयात उपराजधानीतील वंडरबॉय वरद मालखंडाळेने तीन राष्ट्रीय विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत. हा मुलगा अवघ्या ४ वर्षे वयाचा असून एवढ्या कमी वयात ही कामगिरी करणारा तो देशातील एकमेव बालक ठरला आहे. त्याने रविवारी एका मिनिटात ५१ शब्दांचे स्पेलिंग सांगण्याचा व ७० सेकंदात १०० ते ० पर्यंत उलटे पाढे म्हणण्याचा विक्रम केला. यापूर्वी ४ आॅक्टोबर २०१५ रोजी त्याने एका मिनिटात जास्तीतजास्त कारचे मॉडेल्स ओळखण्याचा विक्रम केला होता. इंडिया बुक आॅफ रेकॉर्डस्ने (आयबीआर) त्याच्या विक्रमांवर शिक्कामोर्तब केले आहे.२३ मार्च २०१२ रोजी जन्मलेला वरद नारायणा विद्यालयात केजी-१ मध्ये शिक्षण घेत आहे. त्याचे वडील भूषण सार्वजनिक बांधकाम विभागात उप-अभियंता तर, आई उज्ज्वला प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सहायक प्राध्यापिका आहेत. ‘आयबीआर’ने प्राथमिक तपासणीनंतर वरदला हे तिन्ही विक्रम करण्याची परवानगी दिली होती. वरदचे वय लक्षात घेता त्याला १०० ते ० पर्यंत उलटे पाढे म्हणून दाखविण्यासाठी ९० सेकंदाचा वेळ देण्यात आला होता. परंतु, त्याने हा विक्रम केवळ ७० सेकंदात पूर्ण केला. तसेच, त्याला एका मिनिटात केवळ ३५ शब्दांचे स्पेलिंग सांगायचे असताना त्याने ५१ शब्दांचे स्पेलिंग सांगितले. सुरुवातीला ५ मिनिटे त्याला प्रोजेक्टरवर विविध वस्तूंची चित्रे दाखविण्यातवरदचा आम्हाला अभिमानसध्या नर्सरीमध्ये केवळ १० पर्यंत सरळ मोजणी तर, केजी-१ मध्ये केवळ तीन अक्षरापर्यंतच्या शब्दांचे स्पेलिंग शिकविण्यात येते. परंतु, वरदला अनेक मोठ्या शब्दांचेही स्पेलिंग मुखोद्गत आहे. कारचे मॉडेल्स ओळखण्याचा विक्रम केल्यानंतर त्याला स्पेलिंगची आवड निर्माण झाली. बोलण्यात येणारे मराठी शब्द व दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचे स्पेलिंग माहिती करून घेण्यास तो प्रचंड उत्सुक असतो. दोनदा सांगितल्यानंतर तो स्पेलिंग कधीच विसरत नाही. एकदा त्याने २० ते ० पर्यंत उलटे पाढे म्हटले. यातून त्याची यासंदर्भातील आवड लक्षात आली. थोड्या तयारीनंतर त्याने १०० ते ० पर्यंत उलटे पाढे सहज म्हणून दाखविले. त्याची निरीक्षण व स्मरणशक्ती तीक्ष्ण आहे. तो सतत तार्किक प्रश्न विचारत राहतो. त्याला संस्कृत श्लोक, राष्ट्रगीत व वंदे मातरम् मुखोद्गत आहे. वरदने केवळ ७ महिन्यांच्या काळात तिन्ही राष्ट्रीय विक्रम पूर्ण केले आहेत. एवढ्या कमी वयात ही कामगिरी केल्यामुळे वरदचा आम्हाला अभिमान आहे.- भूषण व उज्ज्वला मालखंडाळे
चार वर्षाच्या वरदचे तीन राष्ट्रीय विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2016 2:46 AM