लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चौथी औद्योगिक क्रांती पर्यावरणासाठी घातक सिद्ध होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाने भविष्यात वाढून ठेवले, ते काहीतरी भयंकर असणार आहे असे मत जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च, डेव्हलपमेंट अॅन्ड डिझाईनच्या नागपूर केंद्राचे संचालक डॉ. अनुपम अग्निहोत्री यांनी व्यक्त केले.दि इन्स्टिट्युशन आॅफ इंजिनियर्सच्या नागपूर केंद्रातर्फे रविवारी ५२ वा अभियंता दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते ‘बदल घडविण्यासाठी अभियांत्रिकी’ विषयावर बोलत होते. कार्यक्रम उत्तर अंबाझरी रोडवरील केंद्राच्या सभागृहात झाला. केंद्राचे अध्यक्ष डॉ. आर. एल. श्रीवास्तव व सचिव डॉ. एम. एस. कडू व्यासपीठावर उपस्थित होते. तंत्रज्ञान शाश्वत व पर्यावरणाला नुकसानकारक असे दोन प्रकारचे असते. तिसरी व चौथी औद्योगिक क्रांती घडवून आणणारे तंत्रज्ञान पर्यावरणाला नुकसानकारक आहे. अभियंत्यांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक नावीन्यपूर्ण शोधामागे अभियंत्याचे डोके असते.औद्योगिक क्रांती अभियंत्यांमुळेच झाली आहे. पहिल्या औद्योगिक क्रांतीने माणसांची जागा यंत्रांनी घेतली. त्यानंतरच्या औद्योगिक क्रांतींनी विमाने, संगणक, इंटरनेट, मोबाईल, रोबोट इत्यादीचा अविष्कार झाला. बदल काळाची गरज आहे. परंतु, बदल शाश्वत असायला हवा असेही डॉ. अग्निहोत्री यांनी सांगितले. अन्य मान्यवरांनीदेखील समयोचित विचार व्यक्त केले. कार्यक्रमात अभियंते मोठ्या संख्येत उपस्थित होते.
चौथी औद्योगिक क्रांती पर्यावरणासाठी घातक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:25 PM
चौथी औद्योगिक क्रांती पर्यावरणासाठी घातक सिद्ध होणार आहे. त्यामुळे पर्यावरणाने भविष्यात वाढून ठेवले, ते काहीतरी भयंकर असणार आहे असे मत जवाहरलाल नेहरू अॅल्युमिनियम रिसर्च, डेव्हलपमेंट अॅन्ड डिझाईनच्या नागपूर केंद्राचे संचालक डॉ. अनुपम अग्निहोत्री यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्दे५२ वा अभियंता दिवस साजरा