शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

नागपुरात 'रोझ' मधून पसरणार प्रेमाचा सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 12:50 AM

जिवलगाचा प्रत्यक्ष होकार मिळविताना कुठलाही धोका नको म्हणून आधीपासून वातावरण निर्मितीसाठी ‘व्हॅलेंटाईन विक’ ही संकल्पना जन्माला आली. आठवडाभर चालणारा हा प्रेमाचा अमूर्त उत्सव गुरुवारपासून सुरु होत आहे.

ठळक मुद्देआज रोझ डे : ‘व्हॅलेंटाईन वीक’साठी ‘यंगिस्तान’ सज्ज

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मनपटलावरील अस्पष्ट जाणिवांना कलात्मक पद्धतीने प्रकट करण्याचा दिवस म्हणजे ‘व्हॅलेंटाईन डे’. १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होतो व तरुणाई वर्षभर याची चातकासाठी प्रतीक्षा करत असते. प्रेमदिवसाला अजून आठवडाभराचा अवधी असला तरी गुरुवारपासूनचे दिवस हे प्रेमानेच भारलेले राहणार आहेत. जिवलगाचा प्रत्यक्ष होकार मिळविताना कुठलाही धोका नको म्हणून आधीपासून वातावरण निर्मितीसाठी ‘व्हॅलेंटाईन विक’ ही संकल्पना जन्माला आली. आठवडाभर चालणारा हा प्रेमाचा अमूर्त उत्सव गुरुवारपासून सुरु होत आहे.‘व्हॅलेंटाईन वीक’चा पहिला मान हा प्रेमाचा सुगंध पसरविणाऱ्या गुलाबालाच आहे. गुरुवार हा जगभरात ‘रोझ डे’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. प्रेमाच्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तरुणाई आपल्या जिवलगांवर लाल-पिवळ्या गुलाबांची उधळण करणार आहे.तसे पाहिले तर ‘व्हॅलेंटाईन’ या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रेमाचा संदेश पाठविणारा मंत्र किंवा भेटकार्ड. मग ते आईवडिलांपासून बहीण-भावंडे, मित्र-मैत्रिणी कुणालाही पाठविलेला असो, प्रेमभावनेच्या ऊर्जेचा अपव्यय न होता जीवनप्रवाह अधिक चांगला होण्यासाठी याचा उपयोग व्हायला हवा, मनाच्या प्रीतीपाकळ्या अलगदपणे उलगडत जात असताना त्या चुरगळल्या जाणार नाहीत, याचा विश्वास पक्का व्हायला हवा. आपल्या सहवासाला व कृतीत पावित्र्य असल्याची खात्री असायला हवी, यातून जवळीक वाढावी, स्नेहबंध जुळावेत आणि एका उदात्त, पवित्र भावबंधनाचे नाते निर्माण व्हावे. हाच खरा ‘व्हॅलेंटाईन वीक’चा संदेश आहे.‘रोझ डे’ला प्रियकर-प्रेयसी प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांना लाल गुलाबाचे फूल देतात. तर मैत्री किंवा अन्य नात्यांमध्ये रंग भरण्यासाठी पांढरे आणि पिवळ्या रंगाचे गुलाब दिले जातेकोणत्या रंगाचे गुलाब कुणाला द्यावे

  • पिवळे गुलाब : मित्र-मैत्रिणींसाठी
  • नारिंगी गुलाब : ज्या व्यक्तीकडे आपल्या इच्छा व्यक्त करायच्या आहेत तिच्यासाठी
  • पांढरे गुलाब : ज्या व्यक्तीला आपण दुखावले आहे, तिला सॉरी म्हणण्यासाठी
  • लाल गुलाब : प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी

असा असेल ‘व्हॅलेंटाईन वीक’७ फेब्रुवारी - रोझ डे८ फेब्रुवारी - प्रपोज डे९ फेब्रुवारी - चॉकलेट डे१० फेब्रुवारी - टेडी डे११ फेब्रुवारी - प्रॉमिस डे१२ फेब्रुवारी - किस डे१३ फेब्रुवारी - हग डे१४ फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे

टॅग्स :Valentine Weekव्हॅलेंटाईन वीकnagpurनागपूर