लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सायबर गुन्हेगारांनी लकी ड्रॉ आणि एटीएम कार्डची मुदत संपल्याच्या नावावर लोकांना ४ लाख ६० हजार रुपयाने फसविले. याप्रकारच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत.पहिली घटना हुडकेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत घडली. कमल पोसराज भगत (६५) रा. उदयनगर यांना ३ आॅगस्ट २०१८ रोजी एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवर फोन केला. त्याने कमल यांना सांगितले की, तो आयडिया कस्टमर केअरमधून बोलत आहे . भगत यांना सिंगापूरच्या एका कंपनीची लॉटरी लागली आहे. ही रक्कम भारतीय चलनात ३५ लाख रुपये इतकी आहे. ही रक्कम मिळविण्यासाठी त्यांना सुरक्षा रक्कम जमा करावी लागेल.भगत यांचा फोन करणाऱ्याच्या बोलण्यावर विश्वास बसला. त्या रक्कम जमा करण्यासाठी तयार झाल्या. फोन करणाºयाने त्यांना बँक अकाऊंट नंबर देत त्यात रक्कम जमा करण्यास सांगितले. ही रक्कम जमा केल्यानंतर भगत यांना पुन्हा पैसै जमा करण्यास सांगितले. आरोपीने भगत यांना वेळोवेळी चार बँक अकाऊंट नंबर दिले. त्यात भगत यांनी ३ आॅगस्ट ते ६ आॅगस्टपर्यंत ३ लाख ७१ हजार रुपये जमा केले. यानंतरही तो त्यांना पैसे जमा करण्यास सांगू लागला. भगत मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यामुळे त्यांनी यापुढे पैसे जमा करण्यास अमर्थता दर्शविली आणि भरलेले पैसे परत मागू लागल्या.यानंतर आरोपींनी त्यांच्याशी संपर्क तोडला. भगत यांनी याप्रकरणाची तक्रार सायबर सेलकडे केली. सायबर सेलच्या तपासात फसवणुकीची घटना आढळून आल्यावर हुडकेश्वर पोलीस ठाण्यात फसवणूक व आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.प्रतापनगर पोलीस ठाणे अंतर्गत अशीच घटना घडली. लोकसेवानगर येथील ६४ वर्षीय लंकेश्वर उमाटे यांना २७ जून रोजी अज्ञात व्यक्तीने ७२८०८७०१४५ या मोबाईल क्रमाांवरून फोन करून एसबीआयमधून बोलत असल्याचे सांगितले. त्याने उमाटे यांना एटीएमची मुदत संपल्याचे सांगितले. एटीएम मुदत वाढवण्यासाठी त्याचा नंबर आणि इतर माहिती विचारली. आरोपीने उमाटे यांच्या मोबाईवर आलेला ओटीपी नंबरही विचारला. या माध्यमाने त्याने त्यांच्या खात्यातून ८९ हजार रुपये परस्पर काढून घेतले. उमाटे यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.शोधून काढणे कठीणसायबर फसवणुकतील आरोपींना शोधून काढणे अतिशय कठीण आहे. हे गुन्हेगार बोगस दस्तावेजावर मोबाईल नंबर मिळवितात. फसवणुकीसाठी भाड्याने बँक खाते वापरतात. आपला अड्डा सातत्याने बदलवित असतात. त्यामुळे ते पोलिसांच्या हाती लागत नाही. शहर पोलिसांना एखाद दुसऱ्या प्रकरणात असे आरोपी हाती लागले आहेत. दिल्ली व उत्तर भारताील अनेक शहरांमध्ये सायबर गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत.