लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सक्करदरा पोलिसांनी डॉक्टर दाम्पत्याविरूद्ध २ कोटी २० लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. योगेश शेंडे आणि त्यांची पत्नी प्रणाली शेंडे (लोकसेवा नगर) यांचा या प्रकरणात सहभाग आहे. या घटनेमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.हे प्रकरण मामला चिंचभवन येथील जमिनीशीसंबंधित आहे. पारनेश्वर बोबडे आणि अन्य सहा व्यक्तींची चिंचभवन येथे जमीन होती. मनोहर अरमरकर यांनी बोबडे आणि अन्य सहा व्यक्तींसोबत २०१५ मध्ये १ कोटी ६२ लाख ५० हजार रुपयात जमिनीचा व्यवहार केला होता. इसाराच्या वेळी अरमरकर यांनी ४२ लाख रुपये शेंडे दाम्पत्याला दिले होते. ही जमीन अर्बन लँड सिलिंग अॅक्टअंतर्गत अधिग्रहित होती. करारानुसार अरमरकर यांनी ही जमीन सिलींग अॅक्टमधून सोडविली. यानंतर अरमरकर यांनी जमीन मालक आणि डॉक्टर दाम्पत्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत डॉक्टर दाम्पत्याने जमीन मालकाकडून विक्रीपत्र करून घेण्याचे ठरले. यानुसार डॉक्टर शेंडे दाम्पत्य १ कोटी २० लाख ५० हजार रुपये जमीन मालकाला देणार असे ठरले. अन्य रक्कम अमरकर यांना देतील असे ठरले. १६ ऑक्टोबर २०१८ ला डॉक्टर दाम्पत्याने रजिस्ट्री केली. त्यांनी अरमरकर यांना २ कोटी ६० लाख रुपयांच्या रकमेचे आठ धनादेश दिले. अरमरकर यांनी दोन धनादेश बँकेत जमा करून ४० लाख रुपये काढले. मात्र उर्वारित धनादेश बँकेतील डॉक्टर दाम्पत्याच्या खात्यावर रक्कम नसल्याने ५ मार्च २०१९ ला बाऊन्स झाले. यानंतर अमरकर यांनी वारंवार डॉक्टर दाम्पत्याकडे पैशाची मागणी केली. मात्र त्यांनी सतत टाळाटाळ चालविली.त्यामुळे अरमरकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी चौकशी सुरू करताच डॉक्टर दाम्पत्याने न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र उच्च न्यायलयाने ती खारीज करून या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा प्रकरणाची चौकशी सुरू केली. दरम्यान फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरात डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2019 12:43 AM
सक्करदरा पोलिसांनी डॉक्टर दाम्पत्याविरूद्ध २ कोटी २० लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. डॉ. योगेश शेंडे आणि त्यांची पत्नी प्रणाली शेंडे (लोकसेवा नगर) यांचा या प्रकरणात सहभाग आहे. या घटनेमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
ठळक मुद्दे२.२० कोटींच्या जमीन खरेदीचे प्रकरण : सक्करदरा पोलिसात गुन्हा दाखल