शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कौन बनेगा करोडपतीच्या नावाने करताहेत ‘कंगालपती’; नागपुरात ठगबाजीचा नवा फंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 9:44 AM

नागपुरात महानायक अमिताभ बच्चनचे छायाचित्र असलेले कौन बनेगा करोडपतीचे पोस्टर तसेच २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याची आॅडिओ क्लीप पाठवून सायबर टोळीने अनेकांना कंगालपती बनविण्याचे षङ्यंत्र रचले आहे.

ठळक मुद्दे२५ लाखांच्या लॉटरीचे आमिषसायबर टोळीकडून देशभरात अनेकांना गंडा

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानायक अमिताभ बच्चनचे छायाचित्र असलेले कौन बनेगा करोडपतीचे पोस्टर तसेच २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याची आॅडिओ क्लीप पाठवून सायबर टोळीने अनेकांना कंगालपती बनविण्याचे षङ्यंत्र रचले आहे. दुसऱ्याची रक्कम आपल्या खात्यात वळती करून घेण्यासाठी ठगबाजीचा हा नवा फंडा गेल्या दोन आठवड्यापासून सायबर टोळीने अवलंबला आहे. होय, देशभरात अनेकांच्या मोबाईलवर व्हॉटस्अ‍ॅपच्या माध्यमातून अशाप्रकारे रोज हजारो आॅडिओ क्लीप येत असून, हुरळलेली मंडळी कथित लॉटरीची रक्कम मिळवण्याच्या नादात गंडविली जात आहे.खोदकामात गुप्तधन (सोने) सापडले आहे, ते अत्यल्प रकमेत देण्याची बतावणी करून सर्वसामान्यांना लुटणारी टोळी राजस्थान, मध्य प्रदेशात पूर्वी सक्रिय होती. या टोळीने देशभरात हैदोस घालून अनेकांचे लाखो रुपये लुटल्याच्या बातम्या यायच्या. पुढे ती टोळी थंडावली. दहा वर्षांपूर्वी नायजेरियन टोळी सक्रिय झाली. तुम्हाला अमूक एवढ्या डॉलरचे बक्षीस लागल्याचे मोबाईलवर किंवा मेसेज किंवा संकेतस्थळावर मेल पाठवून नागरिकांना लुटण्याचा सपाटा नायजेरियन टोळीने सुरू केला. या टोळीचा कित्ता गिरवत देशातील अनेक प्रांतात सायबर गुन्हेगार सक्रिय झाले. कधी लॉटरी लागल्याचे, कधी मोबाईल फोन अथवा महागडे गिफ्ट पाठविण्याचे तर कधी विदेशी फेसबुक फ्रेण्डच्या नावाखाली कोट्यवधींचे गिफ्ट देण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगारांनी सर्वसामान्यच नव्हे तर उच्चशिक्षित, धनिकांनाही लुबाडण्याचा सपाटा लावला आहे.‘मी अमूक एका बँकेचा मॅनेजर बोलतो. तुमचे जुने क्रेडिट, डेबिट कार्ड ब्लॉक झाले. तुम्हाला नवीन कार्ड द्यायचे आहे, तुम्हाला गिफ्ट पाठवायचे आहे, असे सांगून एटीएम कार्डची किंवा बँक खात्याची माहिती विचारली जाते अन् दुसऱ्याच क्षणाला आपल्या खात्यातून हजारोंची रक्कम आॅनलाईन ट्रान्सफर झाल्याचा मेसेज संबंधिताच्या मोबाईलवर धडकतो. दिल्ली, नोएडा, झारखंड(तारापूर)मधील टोळ्यांचे गुन्हेगार ही सायबर गुन्हेगारी करीत असून, विविध ठिकाणी फसवणुकीच्या या गुन्ह्यांची नोंदही होते. या सायबर गुन्हेगारांची पद्धत एवढी विलक्षण आहे की ते पकडले जाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.मात्र, प्रसारमाध्यमातून या गुन्ह्यांचा बोभाटा होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक सतर्क झाले असून, या गुन्हेगारांना थोडाफार आळा बसला आहे. त्यामुळे की काय सायबर गुन्हेगारांनी आता कौन बनेंगा करोडपतीच्या नावाने सावज हेरून त्याला कंगालपती करण्याचे षङ्यंत्र रचले आहे. त्यानुसार, कुणाच्याही मोबाईलवर कोणत्याही क्षणी एक व्हॉटस्अ‍ॅप इमेज (फोटो) आणि दुसरी आॅडिओ क्लीप येऊन धडकू शकते. व्हॉटस्अ‍ॅप इमेजमध्ये वरच्या भागात महानायक अमिताभ बच्चनचे छायाचित्र त्यांच्या नावासकट दिसते. त्याखाली इंग्रजीत केबीसी कौन बनेंगा महाकरोडपती असे ठळकपणे लिहून आहे. त्याखाली लिहिलेला मजकूर खालीलप्रमाणे आहे.‘आपके लिए गूड न्यूज है. आपके इस नंबरपे केबीसी कौन बनेंगा महाकरोडपती की जानाब (जानिब) से २५ लाख रुपयोंकी लॉटरी लगी है. लॉटरी हासील करने के लिए निचे लिखे नंबरपर कॉन्टॅक्ट करे. ००९२३०३७७८३१०० नाम : विजयकुमार शर्मावो आपको आपका लॉटरी नंबर पुछेंगे तो आपका लॉटरी नंबर है...०१५०’असा त्यात इंग्रजीत लिहिलेला मजकूर आहे. या लॉटरी नंबरच्या एका बाजूला केबीसीची मुद्रा आणि तिरंगा काढला असून, दुसऱ्या बाजूला अप्रूव्हडची मोहोर तसेच भारताची राजमुद्रा अंकित आहे. त्याखाली विविध मोबाईल सेल्युलर कंपन्यांचे लोगो आहेत.व्हॉटस्अ‍ॅप इमेजसोबतच दुसरी एक आॅडिओ क्लीपही येते.

अशी आहे आॅडिओ क्लीपहॅलो...मै राजेशकुमार शर्मामुंबई कॉल सेंटरसे,केबीसी डिपार्टमेंट की तरफसे,कौन बनेंगा महाकरोडपतीसे बात कर रहा हूंये जो आपका नंबर हैइस नंबरको लॉटरी लगी है २५ लाख रुपये कीआपको और आपकेअगर आप को ये कॅशकंपनीके सुपरवायझर विजयकुमार शर्मापंजाब नॅशनल बँक के मॅनेजर है वो आपको सारे डिटेल्स बतायेंगेकी आज आपको कौनसी बँक से २५ लाख का बिग अमाऊंट दिया जायेंगा...उसका नंबर है. ००९२३०३७७८३१००ये बँक मॅनेजरका नंबर है. ये आपका व्हॉटस्अ‍ॅपसे कॉलर नही लगेंगा. ये १४ अंकोका नंबर है. कॉम्प्युटर नंबर है...आपकी जानीमानी कॉल रिकॉर्ड की जायेंगी १४ कॉम्प्युटरपे. की आप २५ लाख के विजेता बात कर रहे है. आपके मोबाईलमे बॅलन्स नही हो तो ५० रुपये का पहिले रिचार्ज करवाईये. फिर बात करिये... फिरसे आपको एक बार बधाई...

टॅग्स :Crimeगुन्हा