शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

नागपुरात फ्लॅट विक्रीच्या नावाखाली फसवणूक : १० लाख हडपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 8:21 PM

फ्लॅट विक्रीचा सौदा करून १० लाख रुपये घेतल्यानंतर विक्रीपत्र करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि आत्महत्येची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देमानकापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फ्लॅट विक्रीचा सौदा करून १० लाख रुपये घेतल्यानंतर विक्रीपत्र करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आणि आत्महत्येची धमकी देणाऱ्या आरोपीविरुद्ध मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. काशीद खान सलीम खान पटेल (वय ३४) असे आरोपीचे नाव असून तो झिंगाबाई टाकळीतील रजत एनक्लेव्हमध्ये राहतो. काशीद खानने २०१८मध्ये वर्धा येथील रहिवासी शादाब इस्माईल खान (वय २६) यांच्यासोबत फ्लॅट विक्रीचा सौदा केला होता. करारनामा केल्यानंतर २० डिसेंबर २०१८ पासून आतापर्यंत आरोपी काशीद खान याने शादाब कडून १० लाख रुपये घेतले. मात्र त्याने फ्लॅटची विक्री करून दिली नाही त्यांनी. विक्रीपत्रासाठी शादाबने काशीदकडे तगादा लावला असता त्याने ‘त्रास दिला तर आत्महत्या करेन आणि तुम्हाला फसवील’ अशी धमकी दिली. रक्कमही परत केली नाही. त्यामुळे शादाबने काशीबविरुद्ध मानकापूर पोलिसांकडे तक्रार नोंदविली. उपलब्ध कागदपत्राच्या आधारे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. काशीदची चौकशी सुरू आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी