शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

आरडी, एफडीत कोट्यवधींचा गंडा; ठकबाज प्रदीप खंगार विरोधात अखेर गुन्हा दाखल

By योगेश पांडे | Published: July 24, 2024 4:23 PM

Nagpur : २०२२ पासून खातेदारांची रक्कम भरली नसल्याची माहिती; हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

योगेश पांडे - नागपूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोट्यवधींची आरडी व एफडीची रक्कम घेऊन फरार झालेल्या ठकबाज प्रदीप खंगार विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगणा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठकबाज खंगारने शेकडो ठेवीदारांकडून आरडी आणि एफडीएच्या नावे पैसे घेतले. मात्र त्यांच्या टपाल खात्यात जमा केले नाही. रायपूर ग्रामपंचायत येथील रहिवासी प्रदीप खंगारने पत्नीच्या नावावर टपाल खात्याची एजन्सी घेतली. लोकांच्या घरी जाऊन तो बचत योजनांसाठी पैसे गोळा करीत होता. पंचवीस ते तीस वर्षांपासून या क्षेत्रात काम करीत असल्याने खातेदारांचा विश्वास संपादन केला होता. दैनंदिन पैसे वसुलीसाठी तो फिरायचा. अचानक २७ जून २०२४ पासून तो बेपत्ता झाला. त्यामुळे ग्राहकांनी टपाल कार्यालयात जाऊन चौकशी केली असता त्याने २०२२ पासून खातेदारांची रक्कम भरली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खातेदारांमध्ये खळबळ उडाली. त्यांनी पोलीस स्टेशन हिंगणा येथे तक्रार केली. शेकडो गुंतवणूकदारांची त्याने फसवणूक केली होती. चिंतीत गुंतवणूदारांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीला हिंगणा पोलीस ठाणे गाठले होते. मात्र खंगार बेपत्ताच होता. या प्रकरणात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नलिनी पुरुषोत्तम ताबुलकर (५२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रदीप व त्याची पत्नी वंदना खंगार (४८) याच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ४०६, ४०९, ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ३४ तसेच महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संबंधाचे संरक्षण अधिनीयमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आकडा १० कोटींच्या पुढेसद्यस्थितीत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात फसवणूकीचा आकडा २.२५ कोटी इतका आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा १० कोटींहून अधिक आहे. खंगार अद्यापही फरारच असून त्याचा शोध सुरू आहे.

ठेवीदार झाले रडवेले

खंगारकडे पैसे सोपविणारे अनेक ठेवीदार हे गरीब किंवा निम्नमध्यवर्गीय कुटुंबातील आहेत. मुलांच्या भविष्यासाठी पोटाला चिमटा काढून लोकांनी पोस्टात बचत होईल या विचारातून खंगारवर विश्वास टाकला होता. मात्र त्याने विश्वासघात केला. आपले पैसे कधी परत मिळणार हा प्रश्न घेऊन ठेवीदार पोलीस ठाण्याच्या चकरा मारत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर