लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्कॅ्रच कार्डच्या माध्यमातून बक्षिसात महागडे घरगुती सामान देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. ही टोळी महिलांच्या माध्यमातून अनेकांना फसवित आहे. २०० रुपये देऊन स्क्रॅच कार्डची विक्री करणाऱ्या टोळीचा बनावटपणा, काही नागरिक त्यांच्या कार्यालयात पोहचल्यानंतर सामोर आला आहे.ओम श्री साई इंटरप्राईजेस नावाने ही टोळी चालविली जात आहे. यात कार्यरत काही महिला घरोघरी जाऊन ग्राहक बनवित आहे. २०० रुपयात स्क्रॅच कार्ड खरेदी केल्यानंतर फ्रीज, एलसीडीसह महागडे घरगुती सामान उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखविले जाते. स्क्रॅच कार्ड मध्ये बक्षीस लागल्यानंतर ४९९९ रुपये जमा करून वस्तू मिळविल्या जाऊ शकते. स्क्रॅच कार्डमध्ये योजनेच्या अटी शर्तीची माहिती देण्यात आली आहे. केवळ २०० रुपयांत मिळत असल्याने अनेक महिलांनी स्कॅ्रच कार्डची खरेदी केली आहे. कार्डवर ओम साई इंटरप्रायजेसचा पत्ता मेडिकल चौक, हनुमाननगर दिला आहे. या पत्त्यावर पोहचल्यानंतर लोकांना ही योजना बनावट असल्याची माहिती मिळते.या पत्त्यावर ५८ वर्षीय अशोक भालेराव राहतात. भालेराव यांचा या योजनेशी काहीही संबंध नाही . पीडित त्यांच्या घरी पोहचल्यानंतर तेही अवाक झाले. भालेराव यांनी घटनेची माहिती अजनी पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अजनी पोलिसांनी स्क्रॅच कार्ड योजना बनावट असून यासंदर्भात काहीही माहिती मिळाल्यास ०७१२-२७४६५५५ या क्रमांकावर अथवा १०० नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.
नागपुरात स्क्रॅच कार्ड योजनेतून फसवणुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:54 PM
स्कॅ्रच कार्डच्या माध्यमातून बक्षिसात महागडे घरगुती सामान देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणारी टोळी शहरात सक्रिय झाली आहे. ही टोळी महिलांच्या माध्यमातून अनेकांना फसवित आहे. २०० रुपये देऊन स्क्रॅच कार्डची विक्री करणाऱ्या टोळीचा बनावटपणा, काही नागरिक त्यांच्या कार्यालयात पोहचल्यानंतर सामोर आला आहे. ओम श्री साई इंटरप्राईजेस नावाने ही टोळी चालविली जात आहे.
ठळक मुद्देघरोघरी फिरताहेत महिला : पोलिसांकडून तपास सुरू