लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीच्या मुद्यावर मैदानात सरसावलेल्या अॅड. श्रीहरी अणे यांच्या विदर्भ राज्य आघाडीने मंगळवारी झालेल्या पक्षाच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जाहीरनामा प्रसिद्ध केला. अन्य कोणत्याही पक्षांचे जाहीरनामे अद्याप प्रकाशित झाले नसताना विदर्भ राज्य आघाडीने मात्र यात एक पाऊल पुढे टाकले आहे. या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या मुलांना १२ वी पर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचे आश्वासन देण्यात आले अहे.विराच्या या जाहीरनाम्यामध्ये एकूण १८ मुद्यांचा समावेश आहे. विदर्भ राज्याची निर्मिती झाल्याने काय फायदे होऊ शकतात, याचेच विवेचन या जाहीरनाम्यातून पक्षाने केले आहे. महत्त्वाचे म्हणजे विदर्भ डोळ्यापुढे ठेवून या जाहीरनाम्यातील मुद्दे असल्याने पूर्णत: विदर्भावर या पक्षाचा फोकस असल्याचे स्पष्ट दिसत आहे.कृषी, सिंचन, रोजगार आणि व्यापार अशी या जाहीरनाम्याची रचना दिसत आहे. शेतकºयांना संपूर्ण अर्थसाहाय्य आणि उपकरणासाठी सुलभ दरामध्ये कर्ज उपलब्ध करण्याची हमी या जाहीरनाम्यामध्ये पहिल्याच क्रमावर दिली आहे. शेतात जाण्यासाठी रस्ते आणि गावाजवळच योग्य भावात शेतमाल विकण्याची सोय करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे. शेतकºयांच्या मुलांना १२ वीपर्यंत मोफत शिक्षण, स्वस्त दरात शेतीसाठी अखंड वीज, दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीसाठी नि:शुल्क विमा, सिंचन प्रकल्पांची पूर्तता आणि शेतीयुक्त ओलित जमीन असा कृषिपूरक जाहीरनामा आहे.विदर्भातील बेरोजगार आणि तरुणांचाही या जाहीरनाम्यात विचार करण्यात आला आहे. विदर्भ पब्लिक सर्व्हिसचे गठन करून शासकीय नोकऱ्यांमध्ये विदर्भातील तरुणांना १०० टक्के आरक्षण, आदिवासी भागात राहणाऱ्या तरुणांच्या सांस्कृतिक गरजांचे जतन करून रोजगार निर्मिती, अनुसूचित जाती-जमातीच्या तरुणांना रोजगारासाठी अर्थसाहाय्य, महिलांना गृहउद्योगासाठी विशेष कृती कार्यक्रम, ग्रामीण रोजगार निर्मिती या मुद्यांचाही समावेश आहे.कृषीसंदर्भात सिंचन बाजारपेठा, प्रक्रिया उद्योगांचाही यात समावेश आहे. पूर्व विदर्भात धान संशोधन केंद्र, पश्चिम विदर्भात कापूस, तेलबिया, कडधान्य प्रक्रिया उद्योग, यासोबतच एमआयडीसीमध्ये वैदर्भीय तरुणांना संधीचेही आश्वासन यात देण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांना १२ वीपर्यंत मोफत शिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 7:35 PM
विदर्भ राज्य आघाडीने मंगळवारी झालेल्या पक्षाच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या मुलांना १२ वी पर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
ठळक मुद्देविदर्भ राज्य आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध