शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

शहीद जवान, आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या पाल्यांना मोफत शिक्षण; नागपूर विद्यापीठाचा निर्णय  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 9:54 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने शहीद जवान तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांना दिलासा देण्याचे ठरविले आहे.

नागपूर, दि.10 -  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाने शहीद जवान तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्यांना दिलासा देण्याचे ठरविले आहे. अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर विभागांमध्ये मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. या प्रस्तावाला गुरुवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली. पुढील शैक्षणिक सत्रापासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.   कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी सांगितले की, विदर्भातील शेतक-यांची आत्महत्या अद्यापही थांबलेली नाही. आत्महत्या केलेल्या काही शेतक-यांची मुले विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना आर्थिक तंगीमुळे विविध अडीअडचणींचा सामना करावा लागतो. अशा विद्यार्थ्यांचे विद्यापीठातील सर्व प्रकारचे शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थी संघटनांतर्फे अनेक दिवसांपासून होत होती. सोबतच जवान देशासाठी शहीद होतात. त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे. सामाजिक जाणिवेतूनच शहीद जवानांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचादेखील प्रस्ताव होता. यासंदर्भात गुरुवारी कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. विद्यापीठाच्या सर्व पदव्युत्तर विभाग तसेच संलग्नित महाविद्यालयांत शहीद जवान किंवा आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला. विभागांमध्ये विद्यार्थ्यांकडून कुठलेही शुल्क घेण्यात येणार नाही. तर संलग्नित महाविद्यालयांत त्यांनी प्रवेश घेतला तर त्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्यात येईल. २०१७-१८ चे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे हा निर्णय पुढील शैक्षणिक सत्रापासून अमलात आणल्या जाईल. याबाबत लवकरच अधिसूचना जारी करण्यात येईल, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.