शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

भीम अ‍ॅप आणि डेबिट कार्डद्वारे विनाशुल्क वीज बिल भरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 10:20 AM

वीज ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या महावितरणने आता भीम अ‍ॅप आणि डेबिट कार्र्डद्वारे वीज बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देमहावितरण भरणार अतिरिक्त सुविधा शुल्क

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वीज ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या महावितरणने आता भीम अ‍ॅप आणि डेबिट कार्र्डद्वारे वीज बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. ५०० रुपयांपेक्षा अधिकच्या वीज बिलाचा भीम अ‍ॅप आणि डेबिट कार्डद्वारे भरणा करणाऱ्या ग्राहकांना जवळपास पाऊण ते एक टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागत होते. आता हे अतिरिक्त शुल्क महावितरण भरणार असून ग्राहकांना केवळ वीज बिलाची रक्कम भरावी लागणार आहे. या सुविधेचा अधिकाधिक ग्राहकांना लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता रफीक शेख यांनी केले आहे.महावितरणकडून आॅनलाईन वीज बिल भरणा अधिक सुलभ करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून हे शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपुरात उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. अशावेळी वीज ग्राहकांनी भरउन्हात वीज बिल भरणा करण्यासाठी रांगेत लागण्यापेक्षा घरबसल्या स्मार्ट फोन किंवा इंटरनेटचा वापर करून वीज देयकाचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.यापूर्वी डेबिट कार्डद्वारे ५०० रुपयांपर्यंतचा वीज बिल भरणा सुविधा शुल्काशिवाय होत असे. तर डेबिट कार्डद्वारे भरणा होणाऱ्या पाचशे ते दोन हजार रुपयांच्या वीज बिलासाठी ०.६ टक्के आणि त्यावर १८ टक्के जीएसटी असे जवळपास ०.७१ टक्के तर दोन हजारापेक्षा अधिकच्या बिलासाठी ०.८२ टक्के व त्यावर १८ टक्के जीएसटी असे सुमारे ०.९७ टक्के सुविधा शुल्क आकारले जात. वीज बिलाच्या एकूण रकमेच्या पाऊण ते एक टक्का असलेले हे सुविधा शुल्क आता महावितरणकडून भरण्यात येणार आहे. त्यामुळे डेबिट कार्डद्वारे वीज बिलाचा भरणा करणाऱ्या वीज ग्राहकांवर अतिरिक्त सुविधा शुल्काचा बोजा पडणार नाही, असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण