लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : समग्र शिक्षा अभियानांतर्गत यावर्षी नागपूर जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक मिळणार आहे. जि.प.च्या शिक्षण विभागाने यासाठी पाठ्यपुस्तकाची ऑनलाईन नोंद बालभारतीकडे केली आहे. बालभारतीकडून मागणीनुसार पुस्तकाचा पुरवठा सुरू झाला असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे.वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्य पुस्तकांचे वितरण करण्यात येते. यासाठी जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानित, शासकीय, अंशत: अनुदानित, समाजकल्याण अनुदानित या शाळेतील विद्यार्थ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात येतो. २०१९-२० या सत्राकरिता नागपूर जिल्हा परिषद, नगर परिषद, शासकीय, खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या मागविण्यात आली. शाळाने भरलेल्या युडीआयएस डाटानुसार इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत ९९,१११ विद्यार्थी, पाचवी ते आठवीपर्यंत ९८, ८०५असे एकूण १ लाख ९७ हजार १६ विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. तालुकास्तरावर पाठ्यपुस्तकाच्या वितरणाची जबाबदारी शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.पुस्तके लवकरात लवकर मिळावीत, यासाठी जिल्हास्तरातून मे महिन्यात पाठ्य पुस्तके ब्लॉकस्तरावर उपलब्ध करून देण्यात येत आहे. तेथून ती शाळांनी प्राप्त करावयाची आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत शाळेत सर्व पुस्तके पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
१ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्य पुस्तके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 1:06 AM
समग्र शिक्षा अभियानांतर्गत यावर्षी नागपूर जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक मिळणार आहे. जि.प.च्या शिक्षण विभागाने यासाठी पाठ्यपुस्तकाची ऑनलाईन नोंद बालभारतीकडे केली आहे. बालभारतीकडून मागणीनुसार पुस्तकाचा पुरवठा सुरू झाला असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देशाळेच्या पहिल्याच दिवशी होणार वाटप : २०१९-२० सत्रासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी