लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एप्रिल महिन्यात महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात सहा इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत़ महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या या ‘तेजस्विनी’ बसमध्ये लष्कर, अग्निशमन, पोलीस दलातील शहिदांच्या पत्नी वा त्यांच्या कुटुंबातील एका महिलेला मोफत प्रवासाची सुविधा महापालिका उपलब्ध करणार आहे़शासनाच्या तेजस्विनी योजनेंतर्गत महापालिकेच्या परिवहन विभागात सहा इलेक्ट्रिक मिडी बस पुढील महिन्यात दाखल होणार आहेत़ यापूर्वीही शहरात तीनवेळा महिलांसाठी स्वतंत्र बस चालविण्याचा प्रयोग करण्यात आला, मात्र तो फसला. दरम्यान, आता नव्याने दाखल होणाऱ्या तेजस्विनी इलेक्ट्रिक मिडी बस मोठ्या बसच्या तुलनेत अत्यंत सोयीस्कर असल्याने तसेच फक्त महिलांसाठीच राहणार असल्याने यातून प्रवास करताना कुठलीही अडचण येणार नाही. या बसमध्ये चालक-वाहकदेखील महिलाच असतील़१४ एप्रिल रोजी या सहा बस सुरू करण्याचा परिवहन समितीचा मानस आहे़ पहिल्या दिवशी शहरभर विशेष बस म्हणून या बसेस धावतील़ सहापैकी एका बसमध्ये नेत्यांच्या कुटुंबातील महिला प्रवास करतील. दुसऱ्या बसमध्ये लष्कर, निमलष्करी दल, अग्निशमन विभाग आणि पोलीस विभागातील शहिदांच्या पत्नींना शहराची सफर घडविली जाईल़ तिसऱ्या बसमध्ये महिला पोलीस अधिकारी आणि महिला उद्योजिकांना, चौथ्या बसमध्ये महिला पत्रकार आणि महिला खेळाडूंना, पाचव्या बसमध्ये महिला वकील आणि विविध खेळातील नामवंत महिलांना तर सहाव्या बसमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी, युवतींना शहराची सफर घडविली जाईल़ उद्घाटनाच्या दिवशी शहरभर या सहाही बसेस मोफत धावतील. या माध्यमातून शहरात बसची माहिती होईल. तर या तेजस्विनी बसमधून वर्षभर वीरपत्नींना वा शहिदांच्या कुटुंबातील एका महिलेला मोफत प्रवासाची सोय महापालिकेतर्फे उपलब्ध करून दिली जाईल़ यासाठी वीरपत्नी वा त्यांच्या कुटुंबातील महिलांना शासनाकडून मिळालेले कार्ड दाखवावे लागेल़ परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी याबाबत माहिती दिली़ याबाबत नियमावली व प्रस्ताव लवकरच तयार केला जाणार आहे़केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विजेवर धावणाऱ्या बसेस शहरात सुरू कराव्यात, अशी सूचना नागपूर महापालिकेला केली होती़ त्यानुसार परिवहन समितीने पावले टाकलेली आहे़त.
‘तेजस्विनी’त वीरपत्नींना करता येणार मोफत प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 10:58 AM
एप्रिल महिन्यात महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ताफ्यात सहा इलेक्ट्रिक बसेस दाखल होणार आहेत़ महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या या ‘तेजस्विनी’ बसमध्ये लष्कर, अग्निशमन, पोलीस दलातील शहिदांच्या पत्नी वा त्यांच्या कुटुंबातील एका महिलेला मोफत प्रवासाची सुविधा महापालिका उपलब्ध करणार आहे़
ठळक मुद्देमहापालिके ची महिलांसाठी विशेष बसइलेक्ट्रिकवर धावणार