लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मैत्रीपूर्ण कार्य हाच चांगली मैत्री आणि बंधुत्वाचा पाया आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही हेच विचार मांडले आहेत, असे प्रतिपादन इंग्लंडमधील बौद्ध विचारवंत व साहित्यिक धम्मचारी सुभूती यांनी दीक्षाभूमीवर केले.बुद्ध महोत्सवांतर्गत शुक्रवारी रत्नावली व्याख्यानमालेंतर्गत प्रतित्य समुत्पाद (कार्यकारण भाव) याविषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. धम्मचारी सुभूती म्हणाले, कर्माचे नियम हे नैतिक व्यवस्थेला नियंत्रित करतात. स्वत:बद्दल केवळ मनुष्यच विचार करू शकतो. त्यामुळे मनुष्य अनेक निर्णय घेण्यास सक्षम असतो, अशा प्रकारे त्यांनी कार्यकारण भाव समजावून सांगितला. धम्मचारी सुभूती यांच्या इंग्रजीतील व्याख्यानाचा अनुवाद धम्मचारिणी मोक्षसारा यांनी केले.यावेळी सेव्हन आटर््स अकादमीच्या जयश्री शाक्य आणि जाईबाई चौधरी ज्ञानपीठच्या विद्यार्थिनींनी समस्य संबुद्ध अभिवादन नृत्य सादर केले. यानंतर अरविंद उपाध्याय आणि त्यांच्या चमूने भारतीय संगीत व पाश्चिमात्य संगीताचे सादरीकरण केले. धम्मचारी नागकेतू यांनी संचालन केले. अश्विन कापसे यांनी आभार मानले.
युवकांनो स्वयंरोजगाराकडे वळाबुद्ध महोत्सवात शुक्रवारी दुपारी भीम इंटरप्रीनरशीप डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे ‘मिशन इंटरप्रीनरशीप’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. अनिल गायकवाड यांनी ‘उद्योग का करायला हवा’ यावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले आता देशभरात शासकीय नोकºया कमी होऊ लागल्या आहेत. त्यामुळे युवकांनी आता उद्योगाकडे वळावे. पिरामिड ग्रुपचे निदेशक संजय गोस्वामी, रिटा पोटपोसे, अश्विन कापसे यांनी आपल्या अनुभवाच्या आधारावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विनोद तावडे यांनी भीम इंटरप्रीनरशीप डेव्हलपमेंट कौन्सिलबाबत सादरीकरण केले. केंद्र सरकारच्या मध्यम उद्योगाचे माजी सहायक संचालक चक्रधर दोडके, सीए विक्रम बोरकर, हेमंत वाघमारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.आज चि कुंग चिनी व्यायाम व सांस्कृतिक कार्यक्रम२४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता चि कुंग ही चिनी व्यायाम कला सर्वांसाठी खुली राहील. दुपारी २.३० वाजता केवळ डॉक्टरांसाठी राहील. मास्टर सिफू स्टीव्हन हे ही कला शिकवतील. सायंकाळी ६ वाजता धम्मचारी सुभूती यांचे व्याख्यान होईल आणि त्यानंतर नेदरलँडचे नामग्याल ल्हामो हे संगीमय कार्यक्रम सादर करतील.