लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अलिकडेच प्रियंका चोप्रानेही ज्याला न्यूयॉर्कमधील आपल्या सोना या रेस्टॉंटमध्ये मानाचे स्थान दिले त्या, मुंबईकर आणि तरुणाईच्या लाडक्या वडापावाचा आज वाढदिवस..जागतिक वडापाव दिवस हा २३ ऑगस्ट या दिवशी भलेही साजरा केला जात असतो, पण मुंबईकरांसाठी दररोजचा दिवस हा वडापाव डेच असतो.या वडापावाची जन्मकथा आपण दरवर्षीच वाचतो.. ऐकतो.. १९६६ साली मुंबईतील दादर भागात नाश्त्याची गाडी लावणाऱ्या अशोक वैद्य यांच्या कल्पकतेतून याचा जन्म झाला असे सांगितले जाते. बटाटयाची सुकी भाजी व पोळी असे देण्यापेक्षा त्या भाजीला डाळीच्या पिठात घोळून त्याचे वडे तळून ते पोळीत देण्याची कल्पना त्यांना सुचली. त्यामागे सहजतेने सुटसुटीतपणे खाता यावे असा हेतू होता. वैद्य यांच्यासोबतच सुधाकर म्हात्रे यांचेही नाव वडापावाच्या निमिर्तीसाठी घेतले जाते.या दोघांनी अवघ्या मानवजातीवर उदंड उपकार वडापावाच्या रुपाने करून ठेवले आहेत.वडापाव जसजसा ग्लोबल होत गेला तसतसे त्याचे रुपडेही पालटत गेले. बटाटा भाजीऐवजी अनेकविध पदार्थ वापरून तो बनवला जाऊ लागला. असे म्हणतात, सद्यस्थितीत जगात वडापावाचे किमान १०० प्रकार अस्तित्वात असतील. ज्यात, मॅगी वडापाव, चीज कॉर्न, पालक कॉर्न, मसाला वडापाव, मंचुरियन वडापाव,चिकन वडापाव, चीज बर्स्ट वडापाव यासह देशविदेशातील खवैय्यांच्या आवडीनुसार वडापावाचे प्रकार आहेत. दुसरं म्हणजे, टपरीवरच्या २०-३० रुपयाच्या वडापावापासून ते थेट प्रियंका चोप्राच्या १ हजार रुपयांच्या वडापावापर्यंतचे प्रकार आहेत.तर मग, चला, वडापावाचा वाढदिवस साजरा करू या.. वडापाव खाऊया..
डियर वडापावा, किती तुझ्या तऱ्हा आणि केवढी तुझी भरारी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 1:31 PM
Nagpur News अलिकडेच प्रियंका चोप्रानेही ज्याला न्यूयॉर्कमधील आपल्या सोना या रेस्टॉंटमध्ये मानाचे स्थान दिले त्या, मुंबईकर आणि तरुणाईच्या लाडक्या वडापावाचा आज वाढदिवस..
ठळक मुद्देटपरी ते प्रियंका चोप्राचे आलिशान सोना रेस्टॉरंटपर्यंतचा वावर