शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
3
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
5
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
6
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
7
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
8
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
9
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
10
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
11
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
12
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
13
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
14
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
15
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
16
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
18
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
19
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
20
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!

नागपुरातून फडणवीस, मते, खोपडे, मेघे रिंगणात; सावरकर यांच्याऐवजी कामठीतून बावनकुळे

By योगेश पांडे | Published: October 20, 2024 5:30 PM

उर्वरित सहा जागांवर कोण, ‘बीजेपी’तील इच्छुकांचा ‘बीपी’ वाढला

नागपूर: भारतीय जनता पक्षातर्फे विधानसभा निवडणूकांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यात नागपूर जिल्ह्यातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृष्णा खोपडे, मोहन मते व समीर मेघे यांना परत संधी देण्यात आली आहे. तर ‘लाडकी बहीण’च्या ‘जुगाड’ वक्तव्यामुळे चर्चेत आलेले टेकचंद सावरकर यांचे कामठीतील तिकीट कापण्यात आले असून तेथून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे निवडणूक लढविणार आहेत. रामटेक वगळता जिल्ह्यातील उर्वरित सहा जागांवर पक्षाकडून कोण लढणार हे गुलदस्त्यात असून इच्छुकांची धाकधूक आणखी वाढली आहे.

भाजपच्या बहुप्रतिक्षित यादीची रविवारी दुपारी घोषणा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातूनच लढणार आहेत. तर विद्यमान आमदार कृष्णा खोपडे (नागपूर-पूर्व), मोहन मते (नागपूर-दक्षिण), समीर मेघे (हिंगणा) यांना परत उमेदवारी देण्यात आली आहे. कामठी येथून २०१९ साली नाट्यमयरित्या बावनकुळे यांच्याऐवजी टेकचंद सावरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यानंतर बावनकुळे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली होती. त्यामुळे ते निवडणूक लढतील की नाही याबाबत साशंकता होती. मात्र केंद्रीय भाजपच्या सर्वेक्षणाच्या आधारावर बावनकुळे यांना कामठीतून लढण्याची सूचना करण्यात आली व त्यांचे नाव पहिल्या यादीतच जाहीरदेखील करण्यात आले.

पश्चिम, मध्यमध्ये उमेदवारीवरून संभ्रम कायमनागपूर शहरातील सहापैकी केवळ तीन जागांवरील उमेदवारच जाहीर करण्यात आले आहेत. मध्य नागपुरातून आ.विकास कुंभारे यांच्यासह विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दटके यांनीदेखील दावा केला आहे. येथील मुस्लिम, हलबा मतदारांचे प्राबल्य लक्षात घेता या जागेबाबत अद्याप केंद्रीय निवडणूक समितीने अंतिम निर्णय घेतलेला नाही. तसेच पश्चिम नागपुरातूनदेखील दयाशंकर तिवारी, नरेश बरडे, संदीप जोशी यांच्या नावांची चर्चा आहे. तर नगरसेविका परिणिता फुके यांनीदेखील उमेदवारीसाठी दावा केला आहे. येथील नावदेखील होल्डवर ठेवण्यात आले आहे. उत्तर नागपुरातून भाजपकडूनच माजी आमदार डॉ.मिलींद माने, डॉ.संदीप शिंदे, ॲड.धर्मपाल मेश्राम, अविनाश धमगाये, संदीप गवई, संदीप जाधव हे इच्छुक आहे. तेथून कोणते नाव अंतिम होईल, याबाबत शहर पदाधिकाऱ्यांमध्येदेखील संभ्रम आहे.

जिल्ह्यातील तीन जागांचे काय ?

हिंगणा व कामठी मतदारसंघातील नाव अंतिम झाले असले तरी उमरेड, सावनेर, काटोल या तीन जागांबाबत फैसला झालेला नाही. या तीनही जागांबाबत केंद्रीय भाजपाकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. या तीनही जागा भाजपला मागील वेळी गमवाव्या लागल्या होत्या. उमरेडमधील आ.राजू पारवे हे महायुतीत सहभागी झाले आहेत. त्यामुळे त्यांना परत संधी मिळते की पक्षाकडून दुसरा विचार होतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :BJPभाजपाnagpurनागपूर