नागपूर : शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत शाळांना तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा केला गेला. पण मागील तब्बल सहा महीण्यापासूनचे आहारा करीता लागणारे इंधन, भाजीपाला, खाद्यतेलाचे अनुदान तसेच स्वयंपाकी, मदतनिस यांचे मानधन मिळाले नाही. त्यामुळे "शालेय पोषण आहार, मुख्याध्यापकांच्या डोईवर भार" अशी स्थिती निर्माण झाली आहे.
अक्षरश: शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना आपल्या खिशातून ही योजना चालवावी लागत आहे. त्यामुळे शाळांना शापोआ चे इंधन भाजीपाल्याचे थकीत अनुदान व स्वयंपाकी मानधन तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या वतीने जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे व सरचिटणीस अनिल नासरे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे .