लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : तरुणाच्या अपहरण प्रकरणात दाेन वर्षापासून फरार असलेल्या आराेपीस अटक करण्यात कामठी (जुनी) पाेलिसांना यश आले. त्याला येरखेडा परिसरात सापळा रचून बुधवारी (दि.९) सायंकाळी ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती ठाणेदार राहुल शिरे यांनी दिली.
प्रणय ऊर्फ भुऱ्या पृथ्वीराज बोरकर (३०, रा. नागसेननगर, कामठी) असे अटकेतील आराेपीचे नाव आहे. कामठी शहरातील नागसेननगरात राहणाऱ्या तरुणाच्या अपहरण प्रकरणात प्रणयविरुद्ध ऑगस्ट २०१९ मध्ये कामठी (जुनी) पाेलीस ठाण्यात गुन्हा नाेंदविण्यात आला हाेता. या प्रकरणात पाेलिसांनी चाैघांना अटक केली हाेती. ताे या प्रकरणातील मुख्य आराेपी असून, घटनेनंतर कामठी शहरातून पळून गेला हाेता. त्यामुळे पाेलीस त्याचा दाेन वर्षापासून सतत शाेध घेत हाेते.
दरम्यान, ताे बुधवारी सायंकाळी येरखेडा (ता. कामठी) येथील पीरबाबा दर्गा परिसरात फिरत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. त्यामुळे त्यांनी सापळा रचून शिताफीने प्रणयला ताब्यात घेत अटक केली. त्याच्या विराेधात कामठी (जुनी) पाेलीस ठाण्यात भादंवि ३६४ (अ), ५०६ (ब), ३४ अन्वये गुन्हा नाेंदविला असल्याची माहिती ठाणेदार राहुल शिरे यांनी दिली. ही कारवाई तंगराज पिल्ले, गयाप्रसाद वर्मा, अश्विन चहांदे, प्रणय मेश्राम यांच्या पथकाने केली.