लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हवाईसुंदरीचे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीवर अत्याचार करून तिचे साडेसात लाख रुपये हडपणाऱ्यासह त्याचा भाऊही फ रार असून दोन्हीही आरोपी अजूनही अजनी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. तर घटस्फोटित महिलेवर बलात्कार करून तिला धमकी देणाऱ्या आरोपीकडून पोलिसांनी गुन्ह्याची कबुली मिळवतानाच काही चिजवस्तूही जप्त केल्या आहेत.अजनी अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २१ वर्षीय विद्यार्थिनीला आरोपी मोहित येरपुडे याने गेल्यावर्षी आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ती हवाईसुंदरीचे प्रशिक्षण घेत आहे. तिची आर्थिक स्थिती संपन्न असल्याचे लक्षात घेऊन आरोपीने तिच्याकडून मुंबई, दिल्ली, गोवा आणि अन्य शहराची सफर करून मौजमजाही केली. दरम्यान, तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करून त्याने त्यासंबंधीची अश्लील क्लिप बनविली. ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपीने पीडित तरुणी आणि तिच्या आईकडून साडेसात लाख रुपये हडपले. स्वत:ची सदनिका विकून पीडितांनी आरोपी मोहितला ही रक्कम दिली. त्यानंतरही मोहित आणि त्याचा भाऊ प्रणाय येरपुडे या दोघांनी पीडित मुलीला ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले. ते धमकीही देत होते. त्याचा छळ असह्य झाल्यामुळे पीडित मुलीने शनिवारी अजनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्याची कुणकुण लागताच आरोपी मोहित आणि प्रणय येरपुडे दोघेही फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा ठिकठिकाणी शोध घेत आहेत.बनाफर होणार निलंबितदरम्यान, घटस्फोटित महिलेशी शरीरसंबंध प्रस्थापित करून अश्लील क्लिप तयार केल्यानंतर ती व्हायरल करण्याची धमकी देणारा आणि पीडित महिलेचा छळ करणारा आरोपी विक्रमसिंग बनाफर याला अटक करून बेलतरोडी पोलिसांनी त्याची तीन ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळवली आहे. आतापर्यंतच्या चौकशीत पोलिसांनी आरोपी बनाफरकडून गुन्ह्याशी संबंधित महत्त्वपूर्ण पुरावे मिळवले आहेत. शनिवारी त्याला कोर्टात हजर करून त्याच्या वाढीव पीसीआरची मागणी केली जाणार आहे. दुसरीकडे त्याला निलंबित करण्याच्या हालचालीही पोलिस मुख्यालयात सुरू आहेत.
तरुणीवर अत्याचार करणारा फरार : साडेसात लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 11:07 PM
Rape,Fraud,Crime News, Nagpur हवाईसुंदरीचे प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणीवर अत्याचार करून तिचे साडेसात लाख रुपये हडपणाऱ्यासह त्याचा भाऊही फ रार असून दोन्हीही आरोपी अजूनही अजनी पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
ठळक मुद्देअजनी पोलिसांकडून शोधाशोध