आॅनलाईन लोकमतनागपूर : दंगलीच्या वेळी जमावाकडून होणारा हल्ला थोपविण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र पोलिसांना ‘फूल बॉडी प्रोटेक्टर’दिले आहे. नागपुरात आज सोमवारी या ‘बॉडी प्रोटेक्टर’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले.दंगली किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे काही ठिकाणी अचानक तणाव निर्माण होतो. त्यानंतर जमाव हिंसक बनतो. तुफान दगडफेक केली जाते. जाळपोळही होते. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही दगडफेक केली जाते. जमावातील काही उपद्रवी जळत्या वस्तूही पोलिसांवर फेकतात. अशा हल्ल्यात अनेकदा पोलीस गंभीर जखमी होतात. ते होऊ नये म्हणून गृहमंत्रालयातून काही दिवसांपूर्वी पोलिसांसाठी ‘फूल बॉडी प्रोटेक्टर’ खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी झाली असून, नागपुरात सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बंदोबस्तावर असलेल्या दंगा नियंत्रक पथकातील १०० जणांना ‘फूल बॉडी प्रोटेक्टर’ देण्यात आले. विधानभवनाच्या प्रवेशद्वाराजवळ सोमवारी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा बॉडी प्रोटेक्टर वितरणाचा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त शिवाजीराव बोडखे आणि दीपाली मासिरकर उपस्थित होते.हलके मात्र सुरक्षितराज्यातील सर्वच ठिकाणच्या पोलिसांना हे ‘फूल बॉडी प्रोटेक्टर’युनिट वितरित केले जाणार आहे. नागपुरात आज पहिल्या दिवशी १०० युनिट वितरित करण्यात आले. वजनाने हलके आणि संपूर्ण शरीराचे रक्षण करणारे हे ‘बॉडी प्रोटेक्टर’आतापर्यंत केंद्रीय राखीव दलाच्या जवानांसाठी वापरले जायचे. आता ते राज्य पोलीस दलालाही मिळणार असल्याने पोलिसांना दंगलीसारखी स्थिती हाताळताना चांगली मदत होणार आहे.
सरकारचे पोलिसांना फूल बॉडी प्रोटेक्टर : मुख्यमंत्र्यांनी केले लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 11:28 PM
दंगलीच्या वेळी जमावाकडून होणारा हल्ला थोपविण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र पोलिसांना ‘फूल बॉडी प्रोटेक्टर’दिले आहे. नागपुरात आज सोमवारी या ‘बॉडी प्रोटेक्टर’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
ठळक मुद्देदंगलीच्या वेळी हल्ल्यापासून बचाव