हायकोर्टात शुक्रवारपासून पूर्ण वेळ काम; नोटीस जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 01:21 PM2020-06-03T13:21:08+5:302020-06-03T13:21:29+5:30

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ५ जूनपासून पूर्ण वेळ कामकाज केले जाणार आहे. दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केवळ अत्यावश्यक व अ‍ॅडमिशन श्रेणीतील प्रकरणे ऐकली जातील. यासंदर्भात मंगळवारी नोटीस जारी करण्यात आली.

Full time work in the High Court from Friday | हायकोर्टात शुक्रवारपासून पूर्ण वेळ काम; नोटीस जारी

हायकोर्टात शुक्रवारपासून पूर्ण वेळ काम; नोटीस जारी

Next
ठळक मुद्दे अत्यावश्यक व अ‍ॅडमिशन श्रेणीतील प्रकरणे ऐकली जातील

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ५ जूनपासून पूर्ण वेळ कामकाज केले जाणार आहे. दरम्यान, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केवळ अत्यावश्यक व अ‍ॅडमिशन श्रेणीतील प्रकरणे ऐकली जातील. यासंदर्भात मंगळवारी नोटीस जारी करण्यात आली.
५ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांचा डिव्हिजन बेंच आणि न्यायमूर्ती रोहित देव यांचा सिंगल बेंच, दुपारी २ ते ३.३० व दुपारी ३.४५ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व नितीन सूर्यवंशी यांचा डिव्हिजन बेंच आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांचा सिंगल बेंच, ९ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांचा डिव्हिजन बेंच व न्यायमूर्ती मनीष पितळे यांचा सिंगल बेंच, दुपारी २ ते ३.३० व दुपारी ३.४५ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत
न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व नितीन सूर्यवंशी यांचा डिव्हिजन बेंच आणि न्यायमूर्ती स्वप्ना जोशी यांचा सिंगल बेंच, १२ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांचा डिव्हिजन बेंच व न्यायमूर्ती मनीष पितळे यांचा सिंगल बेंच, दुपारी २ ते ३.३० व दुपारी ३.४५ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व अविनाश घरोटे यांचा डिव्हिजन बेंच आणि न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांचा सिंगल बेंच, १६ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांचा डिव्हिजन बेंच व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांचा सिंगल बेंच तर, दुपारी २ ते ३.३० व दुपारी ३.४५ ते सायंकाळी ५.१५ या वेळेत न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व अविनाश घरोटे यांचा डिव्हिजन बेंच आणि न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांचा सिंगल बेंच कार्य करेल. पहिल्या सत्रात अत्यावश्यक प्रकरणे तर, दुसऱ्या व तिसºया सत्रात अ‍ॅडमिशन श्रेणीतील प्रकरणांवर सुनावणी होईल.

 

Web Title: Full time work in the High Court from Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.