शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
5
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
6
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
7
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
8
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
9
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
10
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
11
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
12
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
13
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
14
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
15
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
16
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
17
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
18
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
19
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
20
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट

औद्योगिक क्षेत्रात अभियंत्यांचे कार्य महत्त्वपूर्ण

By admin | Published: September 15, 2015 6:15 AM

औद्योगिक क्षेत्रात अभियंत्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असून जागतिक स्तरावरील स्पर्धेत अविकसित देशांच्या तुलनेत

नागपूर : औद्योगिक क्षेत्रात अभियंत्यांचे कार्य महत्त्वपूर्ण असून जागतिक स्तरावरील स्पर्धेत अविकसित देशांच्या तुलनेत भारतीय अभियंते अग्रेसर आहे. आपले काम करताना त्यांनी व्यावसायिक बांधिलकी ठेवावी, असे मत मधुकरराव पांडव कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, भंडाराचे प्राचार्य संजय मोवाडे यांनी व्यक्त केले. भारताचे महान सुपुत्र भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या स्मरणार्थ भारतात प्रत्येक वर्षी १५ सप्टेंबरला अभियंता दिन (इंजिनिअर्स डे) साजरा करण्यात येतो. ही संकल्पना निश्चितच कौतुकास्पद आहे. अभियंत्यांनी गुणवत्ता सिद्ध करावीमोवाडे म्हणाले, जागतिकीकरणानंतर मोठ्या प्रमाणात स्थित्यंतरे झाली. त्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय अभियंत्यांना गुणवत्ता सिद्ध करणे गरजेचे आहे. आजच्या युगात अभियंत्यांच्या स्पर्शाशिवाय तयार झालेली एकही वस्तू नाही. प्रत्येक उत्पादनामध्ये अभियंत्यांचे मोलाचे योगदान आहे. जागतिक स्पर्धेत अविकसित देशांच्या तुलनेत भारतीय अभियंते अग्रेसर असले तरीही विकसित देशांच्या तुलनेत काही अंशाने कमी पडत असून याबाबत गुणवत्ता निर्माण करणे काळाची गरज आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात कराएम. विश्वेश्वरय्या यांची जयंती व भारताकरिता त्यांनी केलेल्या महान, उत्कृष्ट कार्याची आठवण व्हावी, यासाठी साजरा करण्यात येणारा अभियंता दिवस हा अभियंत्यांसाठी महत्त्वाचा ठरतो. त्यांचा साधेपणा, दूरदृष्टी, आत्मसंकल्प आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी ते परिचित होते. जागतिकीकरणाच्या स्पर्धेत त्यांचे संशोधनात्मक कार्य डोळ्यापुढे ठेवून अभियंत्यांना अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)विश्वेश्वरय्या यांना भारतरत्नविश्वेश्वरय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी बेंगळुरू शहरापासून ४० कि़मी. अंतरावर मुद्देनाहल्ली येथे झाला. बेंगळुरूच्या मध्य कॉलेजमधून १८८१ मध्ये कला शाखेची पदवी घेतल्यानंतर पुणे येथून अभियांत्रिकीची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण होताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई येथील कार्यालयात काही काळ नोकरी केल्यानंतर भारतीय सिंचन आयोगामध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आले. विश्वेश्वरय्या यांनी पूर नियंत्रणासाठी स्वयंचलित जलनियंत्रण करणारे दरवाजांचे आरेखन केले. त्यासाठी त्यांनी पेटंट घेतले. त्यांनी या पद्धतीचा अवलंब पुणे शहराजवळील खडकवासला धरणासाठी केला. त्यामुळे धरणांचे नुकसान न होता पाण्याचे नियोजन करणे सोपे झाले. नंतर ग्वाल्हेर येथील टिग्रा धरण, म्हैसूर येथील कृष्णराज सागर येथे या पद्धतीचा अवलंब करण्यात आला. हैदराबाद शहराला पुरापासून वाचविण्यासाठी पूर नियंत्रण प्रणाली त्यांनी विकसित केली. आशियातील सर्वात मोठे जलाशय असलेल्या म्हैसूर येथील कृष्ण राजसागर या धरणाच्या निर्मितीच्या वेळी मुख्य अभियंता म्हणून त्यांनी काम पाहिले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५५ मध्ये विश्वेश्वरय्या यांना भारतरत्न हा सर्वाधिक मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.