शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

साश्रूनयनाने अंड्रस्कर कुटुंबावर अंत्यसंस्कार

By admin | Published: June 27, 2017 1:59 AM

जुना सुभेदार लेआऊटवासीयांची सोमवारची पहाट अतिशय सुन्न करणारी ठरली. प्रत्येकाचे पाऊल अंड्रस्कर कुटुंबीयांच्या घराकडे वळली.

जुना सुभेदार लेआऊटमध्ये पसरली शोककळा : हळहळ, अश्रू आणि अलोट गर्दी, प्रशासनाची संवेदनशिलतालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुना सुभेदार लेआऊटवासीयांची सोमवारची पहाट अतिशय सुन्न करणारी ठरली. प्रत्येकाचे पाऊल अंड्रस्कर कुटुंबीयांच्या घराकडे वळली. त्यांच्या घरातून बाहेर निघताना प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणि हळहळ व्यक्त होत होती. एक अख्ख कुटुंब काश्मीरच्या गुलमर्गमध्ये झालेल्या अपघातात हिरावून गेले होते. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अख्ख्या कुटुंबीयांचे पार्थिव त्यांच्या घरी पोहोचले. सुभेदार लेआऊटच्या त्या गल्लीत लोकांनी एकच गर्दी केली होती. चार पार्थिव शेवटच्या विरामाकडे जात असतानाचा प्रसंग बघून प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. मोक्षधाम घाटावर हजारोंच्या उपस्थितीत या कुटुंबीयावर अग्निसंस्कार करण्यात आले. जयंत नामदेवराव अंड्रसकर, त्यांच्या पत्नी मनीषा, सात वर्षांची चिमुकली जान्हवी व पाच वर्षांची अनघा काश्मीरचे सौंदर्य अनुभवण्यासाठी आठ दिवसांपूर्वी रवाना झाले होते. ते परतीच्याच मार्गावर असताना त्यांच्यावर निसर्गाची अवकृपा झाली. या अपघातात अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू झाला. जयंत अंड्रस्कर हे सात वर्षांपूर्वी दिल्ली येथे स्थायिक झाले होते. तेथे डायरेक्टर आॅफ टेक्निकल एज्युकेशन विभागात कार्यरत होते. आई-वडील व भाऊ नागपुरात राहत असल्याने, त्यांच्या पार्थिवाला नागपुरात आणण्यात आले.श्रीनगरवरून त्यांचे पार्थिव दिल्लीला आणण्यात आले. दिल्लीवरून विमानाने मुंबई आणि मुंबईवरून सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास चारही पार्थिव नागपूर विमानतळावर पोहोचले. या पार्थिवासोबत जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाचे अधिकारी पवनसिंग सोढी नागपूर विमानतळापर्यंत आले होते. झालेली घटना अतिशय दु:खद असल्याने ईदची सुटी असतानाही अख्खे जिल्हा प्रशासन कामाला लागले होते. महापालिकेच्या अ‍ॅम्ब्युलन्सने त्यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. आणि त्यांचे पार्थिवच आलेजयंत अंड्रस्कर यांची पत्नी मनीषा यांच्या भावाचे २८ मे रोजी लग्न झाले होते. त्यावेळी जयंत, मनीषा, जान्हवी आणि अनघा नागपुरात आले होते. त्यावेळी सर्वांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. जूनच्या ३० ला मनीषा यांच्या आईचे श्राद्ध होते. काश्मीरवरून आल्यानंतर २८ जूनला ते नागपुरात परतणार होते परंतु काळ आडवा आला. सोमवारी नागपुरात पोहचलेले त्यांचे मृत पार्थिव बघून अंड्रस्कर आणि वांढरे कुटुंब शोकमग्न झाले.पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले अंत्यसंस्कारमोक्षधाम घाटवर एकाच वेळी आई-वडील व दोन मुलींचा अग्निसंस्कार होत असतानाचे दुर्मिळ दृश्य अनेकांनी बघितल्यावर प्रत्येकाचे काळीज फाटले होते. नीरव शांतता अख्ख्या घाटावर पसरली होती. या अंत्यसंस्काराला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हजेरी लावली. त्यांच्या उपस्थितीत चौघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार पार्थिव तीन तासापूर्वी नागपुरातदिल्ली येथून मृत पार्थिवांना मुंबई येथे आणण्यात आले. पार्थिव सोमवारी रात्री ८ वाजता इंडिगो विमानाने नागपुरात पोहोचणार होते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देऊन पार्थिव लवकरात लवकर नागपुरात पोहोचविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार ३.१५ वाजताच्या जेट एअरवेजच्या विमानाने पार्थिव नागपुरात आणण्यात आले. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी सांगितले की, घटनेची गंभीरता व मानवीय दृष्टिकोन लक्षात घेता, प्रशासनाने पुढाकार घेऊन ईदची सुटी असतानाही निवासी जिल्हाधिकारी के. एन. राव यांनी पार्थिव घरापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली.