लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हवामानातील बदलाचे त्वचेवर परिणाम होतात. सर्वात जास्त प्रभाव उन्हाळ्याच्या दिवसात दिसून येतो. अलीकडे त्वचा ‘फंगल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. हवेतील उष्मा, दमटपणा, परत परत येणारा घाम, बुजणारी घर्मग्रंथींची छिद्रे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे त्वचा लाल व ओलसर होते. काही दिवसांनी बाजूला छोटे छोटे पांढरे दाणे येऊन ही बुरशी हळूहळू पसरत जाते. बुरशी येते त्या भागाची आग होते व तिथे कंड सुटतो. या आजारावर अनेक जण स्वत:हून औषधे घेतात. परिणामी, हा आजार बरा होण्यापेक्षा गंभीर रूप धारण करतो, अशी माहिती प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉ. नितीन बरडे यांनी दिली.डॉ. बरडे म्हणाले, आपल्या शरीराचा सर्वात मोठा भाग त्वचा आहे. परंतु अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. सध्या शहराचे तापमान ४५ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. यामुळे घामाच्या धाराने नागपूरवासी त्रस्त आहेत. या घामामुळे त्वचेचे ‘फंगल इन्फेक्शन’ म्हणजे बुरशीजन्य संसर्गाचे रुग्ण वाढले आहेत. अनेक रुग्ण यावर डॉक्टरांचा सल्ला न घेता औषध विक्रेत्यांकडून औषधे घेतात. यामुळे त्यांच्या हातात ‘स्टेरॉईड्स’युक्त क्रीम्स पडते. या क्रीम्समुळे काही दिवसांसाठी आराम पडतो. परंतु नंतर पुन्हा पुन्हा हा आजार उफाळून येतो. ‘फंगल इन्फेक्शन’ होऊ नये म्हणून या दिवसांमध्ये स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. घामोळ्या आल्यास दोनदा अंघोळ कराया दिवसांमध्ये घामामुळे घर्मग्रंथींची छिद्रे बुजल्याने त्वचेवर लाल बारीक पुरळ उठतात. सामान्य भाषेत याला घामोळ्या म्हणतात. काही व्यक्तींना घामोळ्या चटकन येतात. घामोळ्या आल्यास दिवसातून दोनदा थंड पाण्याने अंघोळ करावी. पातळ सुती कपड्याचा वापर करावा. मोकळ्या हवेत पंख्याखाली अधिक वेळ बसावे, असा सल्ला डॉ. बरडे यांनी दिला.नायटाकडेही दुर्लक्ष नकोपावसाळ्यामध्ये बुरशीचा दुसरा प्रकार नायटा म्हणजे ‘रिंगवर्म’चे रुग्ण सर्वात जास्त दिसून येत असले तरी या दिवसातही काही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. यात त्वचेवर कोरडे गोलसर चट्टे उठतात. त्यांना खूप खाज येते. हा प्रकारही जांघ, काख, पार्श्वभाग यावर येतो. हळूहळू पसरत जातो. नायट्याचा प्रादुर्भाव नखांनाही होऊ शकतो.
नागपुरात उन्हामुळे वाढले फंगल इन्फेक्शनचे रुग्ण : नितीन बरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:14 AM
हवामानातील बदलाचे त्वचेवर परिणाम होतात. सर्वात जास्त प्रभाव उन्हाळ्याच्या दिवसात दिसून येतो. अलीकडे त्वचा ‘फंगल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. हवेतील उष्मा, दमटपणा, परत परत येणारा घाम, बुजणारी घर्मग्रंथींची छिद्रे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे त्वचा लाल व ओलसर होते. काही दिवसांनी बाजूला छोटे छोटे पांढरे दाणे येऊन ही बुरशी हळूहळू पसरत जाते. बुरशी येते त्या भागाची आग होते व तिथे कंड सुटतो. या आजारावर अनेक जण स्वत:हून औषधे घेतात. परिणामी, हा आजार बरा होण्यापेक्षा गंभीर रूप धारण करतो, अशी माहिती प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ डॉ. नितीन बरडे यांनी दिली.
ठळक मुद्दे स्वत:हून औषधे न घेण्याचा सल्ला