शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

कॉटन मार्केटमध्ये भीषण आग

By admin | Published: May 21, 2017 2:17 AM

कॉटन मार्केट परिसरातील भाजीबाजारात शनिवारी दुपारी भीषण आग लागली.

३६ दुकाने जळून खाक : शॉर्ट सर्किटमुळे घडली घटना लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कॉटन मार्केट परिसरातील भाजीबाजारात शनिवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत जवळपास ३६ दुकाने जळून खाक झाल्याची माहिती आहे. तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. शनिवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास कॉटन मार्केट येथील भाजी मार्केटमधील एका दुकानातून धूर निघू लागला. त्यामुळे आजूबाजूच्यांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र अल्पावधीतच आगीने रौद्र रूप धारण केले. परिणामी आसपासच्या बासबल्लीने बनविलेल्या इतर दुकानांना आगीने कवेत घेतले. आगीचे वृत्त पसरताच एकच खळबळ उडाली. बाजारात नुसता गोंधळ निर्माण झाला. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर १५ बंबांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून तब्बल तीन तास आग विझविण्याचे प्रयत्न केले. ही आग इतकी झपाट्याने पसरली की पाहता पाहता बाजूची ३६ दुकाने पेटली आणि त्यातील लाखोंचे साहित्य जळून खाक झाले. आग इतकी भीषण होती की दुरूनच आगीच्या ज्वाळा दिसत होत्या. आगीत वहीद भाई, नीलेश सोमकुवर, सम्राट श्याम लिल्हारे, जीवन धारकर, बोंदाडे, सुनील धारकर, दिनेश नायक , भय्यालाल आत्माराम ढोक, राम महाजन, जितू बांगडे, शशिकांत गौर आदी भाजी विकेत्यांच्या दुकानांची राखरांगोळी झाली. घटनेच्या वेळी काही व्यापारी व त्यांचे कर्मचारीही दुकानात उपस्थित होते तर काही दिवसभराचे काम आटोपून निघून गेले होते. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार, आगीने एवढ्या तीव्रतेने रौद्र रूप धारण केले की काही संधीच मिळाली नाही. त्यामुळे अनेकांनी आपला जीव मुठीत धरून बाहेर पळ काढला. आगीत नेमके किती लाखांचे नुकसान झाले, त्याची आकडेवारी मिळू शकली नाही. नुकसानीचा आकडा लाखांत असल्याचे अग्निशमन दलातर्फे सांगण्यात येत होते.