सामान्यांचे बजेट गडबडले : १० ते २० टक्क्यांनी महागले शालेय गणवेश, साहित्यलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पालकांच्या खिशाला नेहमीप्रमाणे यावर्षीही कात्री लागणार आहे. शालेय गणवेश व विविध साहित्य १० ते २० टक्क्यांनी महागले आहेत. त्यामुळे पालकांना खर्चाचा ताळमेळ साधत खरेदी करावी लागणार आहे.येत्या २७ जूनपासून शाळांचा शुभारंभ होत असून पाल्यांसाठी शालेय गणवेश व साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारामध्ये पालकांची गर्दी वाढली आहे. शहरातील काही दुकाने शालेय साहित्यांसाठी प्रसिद्ध आहेत. त्या दुकानांमध्ये पालकांची झुंबड उडाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. अनेक शाळांनी त्यांच्या गणवेशाकरिता विशिष्ट दुकाने ठरवून दिली आहेत. त्या शाळांचा गणवेश संबंधित दुकानातच उपलब्ध होत आहे. परिणामी पालकांना शाळांनी नेमून दिलेल्या दुकानात जाऊनच गणवेश खरेदी करावा लागत आहे. त्यांच्यापुढे दुसरा पर्याय उपलब्ध नाही. शालेय गणवेश व साहित्यांच्या दरासंदर्भात काही दुकानदारांशी संपर्क साधला असता त्यांनी किंमत वाढली नसल्याची माहिती दिली. परंतु, पालकांनी याउलट प्रतिक्रिया व्यक्त केली. यावर्षी शालेय गणवेश व साहित्याचे दर १० ते २० टक्क्यांनी जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय शालेय गणवेश व साहित्याचे दर सारखे नाहीत. प्रत्येक दुकानदार आपापल्या पद्धतीने दर आकारत आहेत.
खिशाला कात्री
By admin | Published: June 19, 2017 2:00 AM