लाेकमत न्यूज नेटवर्क
वाडी : काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने जमावबंदी व संचारबंदीसाेबतच लाॅकडाऊनची घाेषणा केली आणि लाॅकडाऊनचा काळ ३१ मेपर्यंत वाढविला. मात्र, वाडी शहरात बहुतांश नागरिक शासनाने घालून दिलेल्या उपाययाेजनांचा फज्जा उडवित असल्याचे दिसून येत असून, प्रशासन मात्र संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेत आहे. नागरिकांच्या या बेजबाबदारपणामुळे वाडी शहरातील काेराेना रुग्णांमध्ये वाढ हाेताना दिसून येत आहे.
नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे व मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत असूनही वाडी शहरातील चाैकात तरुण विनामास्क फिरताना दिसून येत आहेत. काही तर फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करता, खर्रा चघळत बसून असल्याचेही आढळून येते. अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची व बंद करण्याची वेळ ठरवून दिली असताना, काही दुकानदार शटर बंद करून ग्राहकांना वस्तू विकत आहेत.
शहरातील नागरिक नियम व उपाययाेजनांचे पालन करतात की नाही, हे बघण्याची व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर निदान दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदार स्थानिक नगरपरिषद प्रशासनाने स्वीकारायला हवी हाेती, परंतु वाडी शहरात तसे बघायला मिळत नाही. विविध राजकीय पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्तेही याबाबत गप्प आहेत. दुसरीकडे, जिल्हा प्रशासनाकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने त्यांनाही याकडे लक्ष देणे शक्य हाेत नसल्याने, नागरिकांचा हा बेजबाबदारपणा काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडत असल्याच्या प्रतिक्रिया शहरातील सूज्ञ नागरिकांनी व्यक्त केल्या
...
दारूविक्रीला उधाण
लाॅकडाऊन काळात दारूची दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, या काळात पार्सल सेवा सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले हाेते. मात्र, वाडी शहरातील खडगाव राेड परिसरात पार्सलच्या नावावर अवैध दारूच्या विक्रीला माेठे उधाण आले असून, चढ्या दराने दारूची विक्री केली जात आहे. ही बाब पाेलीस प्रशासनाला माहिती असूनही कारवाई केली जात नाही, असा आराेप या भागातील नागरिकांनी केला आहे.
===Photopath===
170521\img_20210516_193443.jpg
===Caption===
शासकीय नियमाचा फज्जा कसे थांबेल कोरोना संक्रमण