लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन हाेणे गरजेचे आहे. शहरातील बहुतांश बँकाच्या गेटबाहेर माेठी गर्दी दिसून येत आहे. अनेक ग्राहक दाटीवाटीने उभे असलेले दिसून येतात. याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन हाेताना दिसून येत नाही. त्यामुळे काेराेनाचा प्रसार हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शहरातील सर्वच बँकांच्या समाेर सकाळच्या सुमारास माेठी गर्दी असते. बँक उघडल्यानंतर बँकेचे कर्मचारी एक किंवा दाेन ग्राहकांना आत घेतात. अशावेळी उर्वरित ग्राहक मात्र बँकेच्या प्रवेशद्वारासमाेर दाटीवाटीने उभे असतात. यात फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमावलीचे सर्रास उल्लंघन हाेत असल्याचे बघायला मिळत आहे. कडक उन्हामुळे सर्व ग्राहक सावलीच्या शाेधात असतात. अशावेळी बँकांनी बँकेसमाेर माेठा पेन्डाॅल टाकणे आवश्यक आहे. जेणेकरून नागरिकांची गैरसाेय हाेणार नाही व शासनाने दिशानिर्देशित केलेल्या नियमांचे पालन हाेईल. याठिकाणी नागरिक दाटीवाटीने एकत्र उभे राहतात. एखाद्या काेराेना संक्रमित व्यक्तीपासून इतरांनादेखील संक्रमण हाेऊ शकते. त्यामुळे बँकांनी खबरदारी म्हणून याेग्य व्यवस्था करणे गरजेचे आहे.