लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या झिंगाबाई टाकळी राष्ट्रीय नागरी आरोग्य केंद्रावर कर्मचारी कमी असून, गार्डही नाही. त्यात कोरोना तपासणी केंद्रही आहे. येथे सामान्य रुग्ण तपासणी, विविध आजारांच्या रुग्णांची तपासणी, कुष्ठरोग अशा रुग्णांवर एकाच ठिकाणी तपासणी केली जाते; परंतु येथे परिचारिका व टेक्निशियन यांच्यासह पाच कर्मचारी आहेत. रुग्णालयात गर्दी होत असल्याने शोशल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे.
गरीब लोकांची तपासणी व उपचार होणे गरजेचे आहे, तसेच कोरोना टेस्टही घेणे आवश्यक आहे; परंतु सोशल डिस्टन्स पाळले जात नाही. याचा विचार करता येथील कोरोना तपासणी केंद्र दुसऱ्या ठिकाणी हलवणे आवश्यक आहे, यासाठी मनपाच्या बंद शाळा हा पर्याय आहे. कोरोना केंद्र हलविण्याची मागणी माजी झोन सभापती अरुण डवरे यांनी केली आहे.