लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सव आाणि श्री महालक्ष्मी सणामध्ये मंगळवारी लोकांनी सीताबर्डी येथील नेताजी फूल बाजारात फुलांच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली. कोरोना संसर्ग नियमांची पायमल्ली करीत बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून फूल विक्रेत्यांवर मनपाने कारवाई करावी, अशी मागणी विक्रेते आणि लोकांनी केली आहे.गणेशोत्सवात घरी दररोज फुलांची आरास करण्यासाठी लोक नेताजी फूल बाजारात खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. एरवी बाजारात गर्दी असतेच, पण मंगळवारी श्री महालक्ष्मीची स्थापना असल्याने लोकांनी पहाटेपासूनच विविध फुले खरेदीसाठी गर्दी केली. सर्व दुकानदारांनी ओट्याबाहेर दुकाने थाटली होती. त्यामुळे मध्यभागातील रस्ता पूर्णपणे बंद झाला होता. त्यातून मार्ग काढीत लोक खरेदी करीत होते. सजावटीची फुले खरेदीसाठी लोकांना किमान एक तास वेळ बाजारात घालवावा लागतो. अशा स्थितीत कोरोनाचा संसर्ग होण्याचा जास्त धोका असतो. आधीच कळमना भाजी बाजार आणि कांदे-बटाटा बाजारात कोरोना संसर्गाने तीन व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. नागपुरात गर्दीच्या ठिकाणी संसर्गाचा धोका वाढला आहे. दररोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. लोकांच्या गर्दीने या बाजारातही रुग्ण आढळून येण्यास वेळ लागणार नाही. अखेर बाजार बंद करावा लागेल, अशी भीती ठोक विक्रेत्यांनी व्यक्त केली. लोकांनीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून खरेदी करावी, असे आवाहन विक्रेत्यांनी केले आहे.
नागपुरातील नेताजी फूल बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 12:09 AM
गणेशोत्सव आाणि श्री महालक्ष्मी सणामध्ये मंगळवारी लोकांनी सीताबर्डी येथील नेताजी फूल बाजारात फुलांच्या खरेदीसाठी एकच गर्दी केली. कोरोना संसर्ग नियमांची पायमल्ली करीत बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.
ठळक मुद्देरस्त्यावर थाटली फुलांची दुकाने : रहदारीची रस्ता बंद